उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलेला शब्द फिरवला?; संजय राऊतांनी केला खुलासा - Mumbai Tak - rajya sabha election 2022 sanjay raut clear uddhav thackeray stand about sambhaji raje bhosale - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा शहर-खबरबात

उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलेला शब्द फिरवला?; संजय राऊतांनी केला खुलासा

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. संभाजीराजेंनी केलेल्या गौप्यस्फोटावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा काढला. शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून, त्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर […]

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. संभाजीराजेंनी केलेल्या गौप्यस्फोटावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा काढला.

शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून, त्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी शिव संपर्क अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

‘त्यांनी केव्हाही हाक द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर असेन’; 11 महत्त्वाचे मुद्दे

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवल्याच्या आरोपाबद्दल विचारण्यात आला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय, तो चुकीचा आहे. शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेचा उमेदवार येणं किंवा आणायचाच, हे आधीच ठरलं होतं. माझ्या माहिती प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की, पुरस्कृत उमेदवाराच्या विषयाबद्दल मला सहकाऱ्यांशी बोलावं लागेल. इतकंच ते बोलले होते.”

‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती’; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “काल संभाजीराजेंनी त्यांचं मन मोकळ केलं आहे. मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. त्यात नवीन काही नाही. आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी एक निर्णय घेतला की, दोन शिवसैनिक पाठवायचे.”

“जर ४२ मतांचा विषय होता आणि तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल, तर राजे, महाराजे, राजकारणातील संस्थानिकांना कुठल्यातरी राजकीय पक्षांचा हात धरावा लागतो. देशभरात बघितलं, तर महाराणा प्रतापांचे वंशज सुद्धा राजकीय पक्षात आहेत. प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे आहेत. व्यक्तिगत काही नसतं इथे. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. आमच्यासाठी हा विषय संपला,” अशी भूमिका राऊतांनी मांडली.

‘चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?’

संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

पाटलांनी दिलेल्या आव्हानावर राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील कोण? ते काय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे, फसवण्याची परंपरा कुणाची आहे? संभाजीराजे छत्रपती आणि आमच्यातील हा विषय आहे. इतरांनी चोपडेपणा करू नये,” अशा शब्दात राऊतांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेस महाराष्ट्रातून कुणाला पाठवणार राज्यसभेत? कोणती चार नावं आहेत चर्चेत?

देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येताहेत का?

देवेंद्र फडणवीसांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यावर राऊत म्हणाले, “या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे. हा आमच्यातील विषय आहे. त्यांनी ४२ मतं द्यावीत. त्यांना आम्ही उत्तर का द्यायचं. देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षात येत आहेत का? आमच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांना का उत्तर द्यायचं,” असा उलटा सवाल राऊतांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत”

“छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. आम्हाला त्या गादीविषयी पहिल्यापासून आदर आहे. तो तसाच राहिल,” असंही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 17 =

Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया