'शरद पवारांनी भेटायला बोलावलंय'; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र भुयारांनी सोडलं मौन

शिवसेनेनं दगाबाजी केल्याचा आरोप केल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी 'मुंबई तक'च्या मुलाखतीत मांडली भूमिका
'शरद पवारांनी भेटायला बोलावलंय'; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र भुयारांनी सोडलं मौन

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. पराभवानंतर शिवसेनेनं काही अपक्ष आमदारांची नावं घेत दगाबाजी केल्याचा आरोप केलाय. मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यावरही हा आरोप करण्यात आला असून, 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांसह एकूण सहा जणांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नसल्याचा दावा केला. संजय राऊतांनी यात आमदार भुयार यांचही नाव घेतलं.

'शरद पवारांनी भेटायला बोलावलंय'; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र भुयारांनी सोडलं मौन
विधान परिषद निवडणुकीतही आघाडीचा 'कार्यक्रम' होणार?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राऊतांच्या या आरोपावर बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, "देवेंद्र भुयार महाविकास आघाडीनंतर झाली. पहिल्या आघाडीसोबत (काँग्रेस-राष्ट्रवादी) मी होतो. माझी पहिल्या दिवसांपासून स्पष्ट आहे. सत्ता स्थापनेवेळी शिवसेनेनं मला बोलावलं, पण मी गेलो नाही. त्यावेळी मी अजित पवारांसोबत थांबलो. मतासाठी त्यांनी मला बोलावलं होतं. घरी बोलावलं होतं. बैठकीलाही बोलावलं होतं. मी गेलो नाही. मी मागच्या वेळीही मत दिलं आणि यावेळीही मत दिलं."

तुमच्याबद्दल अशी शंका का उपस्थित केली जातेय?, असा प्रश्न विचारला असता भुयार म्हणाले, "त्याला काही ईलाज नाही."

अजून वेळ गेलेली नाही, असं तुम्हाला वाटतंय का?, असा प्रश्नही भुयार यांना विचारला. त्यावर भुयार म्हणाले, "मी त्यांच्यासोबतच आहे. त्यांनीही काहीही म्हटलं तरी मी महाविकास आघाडीसोबत आहे. त्यांनी काहीही आरोप लावले, तरी मी त्यांच्यासोबत आहे. आधीपासूनच आहे. ते (शिवसेना) २०१९ मध्ये सोबत आले. किमान समान कार्यक्रम ठरवताना. मी त्यांच्याआधीपासून आघाडीसोबत आहे."

'शरद पवारांनी भेटायला बोलावलंय'; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र भुयारांनी सोडलं मौन
'शब्द दिला आणि दगाबाजी केली', संजय राऊतांनी 'त्या' आमदारांची थेट नावं सांगून खळबळ उडवली!

होत असलेले आरोप वेदनादायी आहेत का?, या प्रश्नावर भुयार म्हणाले, "इतक्या प्रामाणिकपणाने मत देऊन जर असे वागत असतील, तर हे कितपत योग्य आहे. मी हा विषय शरद पवारांना सांगितला आहे. मी त्यांना असा प्रसंग घडल्याचं सांगितलं. हे पार चुकीचं झालं. आमच्यासारख्या लोकांचं नावं जाहीरपणाने बोलत असतील, तर ते फार चुकीचं आहे."

या प्रकरणाबद्दल भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही म्हणणं मांडलं आहे. "शरद पवारांनी मला दोन-तीन दिवसांनी भेटायला बोलावलं आहे. भेटून या विषयावर चर्चा करू, असं ते म्हणाले आहेत," असं त्यांनी सांगितलं.
'शरद पवारांनी भेटायला बोलावलंय'; संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र भुयारांनी सोडलं मौन
'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही', शरद पवारांची प्रतिक्रिया; नेमका अर्थ काय?

याबद्दल अजित पवारांशी काय बोलणं झालं?, असं भुयार यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, "अजित पवारांनाही मी बोललो आहे. त्यांना हे सगळं सांगितलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीची बैठक ज्यावेळी घेऊ, त्यावेळी तू हा प्रश्न तिथे मांड. समोरासमोर हा विषय निकाली काढू."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in