'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही', शरद पवारांची प्रतिक्रिया; नेमका अर्थ काय?
rajya sabha election this is not a result that will shock me sharad pawar reaction(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही', शरद पवारांची प्रतिक्रिया; नेमका अर्थ काय?

'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेचा नेमका अर्थ काय याबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

पुणे: 'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली.' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. आपल्यासाठी हा निकाल अनपेक्षित नव्हता. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली. असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या चौथ्या उमेदवारासोबत दगा फटका झाला आहे. हा दगा फटका अपक्ष आमदारांकडून झाला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसंच या संपूर्ण निकालाबाबत शरद पवार यांनी आपली नेमकी काय बाजू आहे ती देखील मांडली आहे.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला होता त्या कोट्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. फक्त 1 मत प्रफुल पटेल यांना ज्यादा पडलं आहे. ते कुठनं आलं आहे हे मला ठावूक आहे. ते या आघाडीचं नाही तर दुसऱ्या बाजूचं आहे.' असा दावा शरद पवार यांनी यावेळी केलं आहे.

'आता सहावी सीट जी शिवसेनेने लढवली तिथे आमची मतांची संख्या कमी होती. पण आम्ही धाडस केलं, प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अपक्षांची संख्या ही दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते. त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडलेला आहे.' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'नाही तर जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणं त्यांना मतदान झालेलं आहे. यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मला मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने.. त्या मार्गाात त्यांना यश आलं.' असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं आहे.

'सरकारच्या स्थितरेवर काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅलक्यूलेशन करा ना.. ही सगळी संख्या बघितली. तर सरकार चालवायला जे बहुमत हवं आहे त्याला काहीही धक्का नाही. राजकीय पक्ष मग ते काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा प्रश्न तर त्यात काही गोष्टी झाल्या आहेत.' असं सांगत शरद पवारांनी सरकारला धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

rajya sabha election this is not a result that will shock me sharad pawar reaction
शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊत म्हणतात, भाजपचा विजय झाला असं मी मानत नाही!

'प्रफुल पटेलांना आलेलं एक्स्ट्रा मत हे शिवसेनेला जाणारं नव्हतं. ते एक्स्ट्रा मत हे आमच्या विरोधकांच्या कोट्यातील होतं. ते राष्ट्रवादीला आलं. ते देखील त्यांनी मला सांगून दिलं. तिथे अनेक असे लोकं आहेत ज्यांनी कधी काळी त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे. मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणण्याची त्यांची तयारी नसते. पण मी त्यात पडलो नाही. पण एकाने स्वत:हून मला सांगितलं. त्यामुळे भाजपला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्षाचं मत आम्हाला मिळालं.' असं सांगत शरद पवारांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्नही यावेळी केला आहे.

'तीन वाजता निकाल लागला त्यामागे जी हरकत घेतली होती त्यामुळे उशीर झाला होता. तो रडीचा डाव होता. राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे की, मतदाराने पक्षाच्या प्रतोदाला मत दाखवायचं असतं. त्यामुळे जर कोणी तसं दाखवला तर त्यात काही चुकीचं नाही. फक्त एवढं झालं की, त्यासाठी 6-7 सात उशीर झाला.' अशी खोचक टिप्पणीही शरद पवार यांनी यावेळी केली आहे.

'सुहास कांदे यांचं मत का रद्द झालं हे मला नेमकं माहिती नाही. पण तिघांच्या संबंधी जो निर्णय आहे तो योग्य आहे. एक असतं की, राजकारणात रिस्क घ्यावीच लागते. उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. कमी मतं असून देखील त्यांनी दुसरी जागा लढवली. त्यामुळे मतदानाच्या समन्वयात आमच्याकडून काही त्रुटी राहिली नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मार्गांनी मते खेचण्यात यश मिळवलं. त्याचा हा चमत्कार आहे.' असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in