राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!

राज्यसभा निवडणुकीत राज साहेबांच्या आदेशाप्रमाणे मतदान करू किंवा तटस्थ राहू असं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे.
राज्यसभा निवडणूक: मनसेच्या एकमेव आमदाराने सांगितलं कोणाला करणार मतदान!
rajya sabha elections mns mla raju patil said who exactly will vote maharashtra vidhansabha

मिथिलेश गुप्ता, कल्याण: राज्यसभा निवडणुकीत सहाव्या उमेदवारासाठी महाविकास आघाडी आणि भाजपला प्रत्येक मत महत्त्वाचं आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अशातच आता मनसेच्या एकमेव आमदाराने राज्यसभा निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे. याबाबत भाष्य केलं आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश आलेला नाही. त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल. मतदान करायचं, कोणाला करायचं की तटस्थ रहायचे हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राज साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू.'

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मनसे कुणाच्या पारड्यात मत टाकणार की तटस्थ राहणार याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात असून यंदा या निवडणुकीत चुरस वाढली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपला आपल्या आमदारांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचंही मत मोलाचे ठरणार आहे.

मनसे आपला कौल शिवसेनेच्या पारड्यात टाकणार की भाजपला साथ देणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा जोरदार उचल्याने भाजप-मनसे नेत्यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी मनसे आमदार पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला होता. मात्र, संभाजी राजेंनी माघार घेतली. त्यानंतर अद्याप मनसेने याविषयी भूमिका जाहीर केली नाही.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी असं म्हटलं की, 'आम्ही हाऊसमध्ये तटस्थ म्हणून आहोत. जेव्हा फ्लोर टेस्टिंग झाली तेव्हा आम्ही तटस्थ राहिलो आता मागच्या वेळेस छत्रपती संभाजीराजेंचा फोन आणि मेल आलेला त्यावेळेस राज साहेबांचा आदेश घेऊन त्यांचे नॉमिनेशन फॉर्मवर सही पण केली होती. परंतु या क्षणाला तरी मला राज साहेबांकडून काही आदेश नाहीये त्यामुळे ते जसे सांगतील त्याप्रमाणे पुढे वाटचाल असेल.'

'मतदान करायचं, कोणाला करायचं की तटस्थ रहायचे हा सर्वस्वी पक्षाचा विषय आहे. त्यामुळे राजसाहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करू किंवा तटस्थ राहू अस सांगितलं.

rajya sabha elections mns mla raju patil said who exactly will vote maharashtra vidhansabha
राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीसांना कोरोना; मतदानाचं काय होणार?

दरम्यान, काल दिवसभर मनसे आमदार पाटील नॉट रिचेबल असल्याचे बोलले जात होते. याबाबत आज आमदार पाटील यांना जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की, 'नॉट रिचेबल म्हणजे.. मला काय कोणी उचलून नेणार आहे का? माझी तब्येत ठीक नसल्याने आराम करत होतो. तसेच शनिवारी प्रशासकीय काही काम नव्हती. त्यामुळे घरी आराम करत होतो. नॉट रिचेबल असणे किंवा मला कोठे घेऊन जाणे हे माझ्या बाबतीत होणार नाही. असं राजू पाटील यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in