Rajya Sabha Election : संजय राऊत यांनी जाहीर केली 'एवढ्या' कोटींची मालमत्ता

शिवसेना खासदार यांनी राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर प्रतिज्ञापत्रावर जाहीर केली संपत्ती
Shiv Sena leader Sanjay Raut will file his nomination for the Rajya Sabha on May 26 at the Vidhan Bhavan
Shiv Sena leader Sanjay Raut will file his nomination for the Rajya Sabha on May 26 at the Vidhan Bhavan

शिवसेना खासदार आणि राज्यसभा निवडणुकीचे शिवसेनेचे क्रमांक १ चे उमेदवार संजय राऊत यांनी आज त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरला. तसंच प्रतिज्ञापत्रावर त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

काय आणि किती आहे संजय राऊत यांची संपत्ती?

संजय राऊत यांच्याकडे १ लाख ५५ हजार ८७२ रूपये रोख आहेत

१ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रूपये बँकेत आहेत

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे. त्याची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रूपये आहे. तर १८२० ग्रॅम चांदी आहे त्याची किंमत १ लाख ३० हजार रूपये आहे. त्यांनी एक वाहन घेतलं आहे जे २००४ मध्ये घेतलं आहे. तर दोन रिव्हॉल्वर आहेत.

Shiv Sena leader Sanjay Raut will file his nomination for the Rajya Sabha on May 26 at the Vidhan Bhavan
Rajya sabha Election : हे एका जातीचं, धर्माचं राजकारण करणारे लोक; संजय राऊत भाजपबद्दल काय म्हणाले?

संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षात २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. तर त्यांच्या पत्नी वर्षा यांनी २१ लाख ५८ हजार ९७० इतके पैसे याच आर्थिक वर्षात कमावले.

राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे.

Sanjay Raut declares his total assets on the affidavit for Rajya Sabha Election
Sanjay Raut declares his total assets on the affidavit for Rajya Sabha Election

संजय राऊत यांच्या नावे रायगडमध्ये नॉन अॅग्रीकल्चर जमीनही आहे. या जमिनीची किंमत साधारण २.२० कोटी आहे. त्यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावेही काही जमीन या ठिकाणी आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे. दादरमधे वर्षा राऊत यांच्या नावेही एक घर आहे. या चारही घरांची सध्याची किंमत ६ कोटी ६७ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे व्यावसायिक प्रॉपर्टीही आहे. तसंच त्यांच्या पत्नीच्या नावेही मुंबईत तीन प्रॉपर्टी आहेत. या सगळ्याची किंमत ५ कोटी ५ लाखांच्या घरात आहे. संजय राऊत यांच्या विरोधात २९ केसे दाखल आहेत. यातल्या बहुतांश केसेस या सामनाच्या अग्रलेखातून बदनामी झाल्याने अब्रू नुकसानाचा दावा सांगणाऱ्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in