'शब्द दिला आणि दगाबाजी केली', संजय राऊतांनी 'त्या' आमदारांची थेट नावं सांगून खळबळ उडवली!

कोणत्या आमदारांनी दगा दिला याची थेट यादीच संजय राऊत यांनी मीडियासमोर वाचून दाखवली. ज्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
'शब्द दिला आणि दगाबाजी केली', संजय राऊतांनी 'त्या' आमदारांची थेट नावं सांगून खळबळ उडवली!
rajyasabha election 2022 bahujan vikas aghadi and other 3 mla not vote for shiv sena sanjay raut sensational allegation(फोटो सौजन्य: ANI)

मुंबई: राज्यसभेच्या सहा जांगासाठी महाराष्ट्रात काल (10 जून) निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल तब्बल 9 तासांनी हाती आली आणि त्यात शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा अनपेक्षितरित्या पराभव झाला. ज्यानंतर आज (11 जून) शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट सहा आमदारांची नावं घेत त्यांनीच दगा दिल्याचा आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली.

'वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाही. तसेच करमाळ्याचे संजय मामा शिंदे आणि त्यानंतर अजून एक शिंदे आहेत आमदार हा लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे. तसंच मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार. या आमदारांनी आम्हाला मतं दिली नाहीत. असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.'

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'घोडेबाजारात जी लोकं उभी होती त्यांची 6-7 मतं आम्हाला मिळाली नाही'

'दुसऱ्या पसंतची मतं तिसऱ्या पसंतीची मतं यावरुन जय-पराजय ठरतो. आणि काही घोडे असतात बाजारातील नेहमीचे ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली असं वाटतंय मला. किंवा इतर काही कारणं असतील त्यामुळे आमची साधारण सहा एक मतं होती अपक्षांची ती आम्हाला मिळाली नाही. ते कोणाचेच नसतात. अशी लोकं कोणाचेच नसतात. पण आमचे जे घटक पक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यांचं एकही मत फुटलं नाही.'

'काँग्रसे, राष्ट्रवादी, शिवसेना, बच्चू कडूंचा पक्ष असेल किंवा इतर काही मतांविषयी आम्ही चर्चा केली होती जे पक्षाबरोबर ती सगळी मतं तशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारात जी लोकं उभी होती त्यांची 6-7 मतं आम्ही मिळवू शकलो नाही.' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

'दगाबाजी करणाऱ्यांची यादी आमच्याकडे आहे'

'आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही, कोणता व्यापार केला नाही. तरी संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली हा सुद्धा आमचा एक विजय आहे. अर्थात ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहिती आहे की, कोणी मतं दिली नाहीत आम्हाला. पण ठीक आहे.' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

'मला देखील पाडायचा डाव होता, पण...'

'सुहास कांदे यांचं मत का आणि कोणत्या कारणासाठी बाद केलं हा एक संशोधनाचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेत. फक्त कांदे यांचं मत बाद करुन काही गोष्टी करण्यात आल्या रात्री उशिरा.. पहाटे, यांना पहाटेची फार सवय आहे अपकृत्य करण्याची. पण त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत.'

'मला देखील पाडायचा डाव होता. पण ते शक्य होऊ शकलं नाही. मी फक्त माझ्याशी पक्षाने दिलेल्या 42 मतांवरच लढत होतो. त्यातलं एक मत त्यांनी बाद केलं. मी एकही जास्त मत घेतलं नाही कारण आमच्यात अटीतटीची लढत होती. त्यामुळे मी फक्त 42 मतं घेतली आणि विजयी झालो. यासाठी मी उद्धव ठाकरे आणि पक्षाचा ऋणी आहे.' असं संजय राऊत म्हणाले.

rajyasabha election 2022  bahujan vikas aghadi and other 3 mla not vote for shiv sena sanjay raut sensational allegation
'मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही', शरद पवारांची प्रतिक्रिया; नेमका अर्थ काय?

'भाजपने दिल्लीची ताकद वापरली'

'समोरच्याने दिल्लीची ताकद वापरुन, निवडणूक आयोगाची ताकद वापरुन, केंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरुन घोडेबाजाराला उत्तेजन दिलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची नोंद ठाकरे सरकार आणि जनताही करते आहे.' अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

'कालचा निवडणुकीचा हा घोडेबाजाराचा निकाल आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. संजय पवार हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांच्या पराभवाने उद्धव ठाकरे हे देखील व्यथित झाले आहेत.' अशी भावना यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केली.

राऊतांनी फुटलेल्या मतांची थेट यादीच वाचून दाखवली!

'आम्ही निसरड्या वाटेवर होतो. आम्हाला वाटतं की ज्या लोकांनी शब्द दिले ते पाळले गेले असते विशेषत: वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मतं आम्हाला मिळाली नाही. करमाळ्याचे संजय मामा शिंदे त्यानंतर अजून एक शिंदे आहेत आमदार. नांदेड भागातील. तसंच देवेंद्र भुयार. मी नावं घेऊन सांगतो.' असं म्हणत राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in