"मातोश्रीला खोके नवीन नाहीत, समझनेवाले को इशारा काफी है : रामदास कदम

एवढ्या खोक्यांची मिठाई खाऊन यांना डायबेटिस पण कसा होत नाही, हे महाराष्ट्राला सांगणार
Ramdas kadam - uddhav thackeray
Ramdas kadam - uddhav thackeray Mumbai Tak

मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर गद्दार आणि ५० कोटी रुपये घेतल्याचे सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. या टिकांवर शिंदे गटाकडूनही अनेकदा प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. दरम्यान याच आरोपांवरुन आज शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी "मातोश्रीला खोके नवीन नाहीत, समझनेवाले को इशारा काफी है" असं म्हणतं थेट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच इशारा दिला आहे. ते खेडमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बोलत होते.

रामदास कदम म्हणाले, फक्त गद्दार, खोके-खोके म्हणायचं. पण त्याचं उत्तर माझ्याकडे आहे, मी त्यावर बोलणार आहे, खोक्यांचं उत्तर देणार आहे. मातोश्रीला खोके नवीन नाहीत, समझनेवाले को इशारा काफी है. त्यामुळे आपण कोणाला बोलतोय, काय बोलतोय, पन्नास आमदार का जातात याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे. खोक्यांचे धंदे आमचे नाहीत, ते तुमचे धंदे आहेत. खोके तुम्ही घेता, मिठाई तुम्ही खाता. म्हणून तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीचे बोटं आपल्याकडे असतात याचं ध्यान ठेवा असा इशाराही रामदास भाई कदम यांनी यावेळी दिला.

Ramdas kadam - uddhav thackeray
CM शिंदे मनोहर जोशी-मिलिंद नार्वेंकरांच्या घरी : ठाकरेंच्या सहकाऱ्यांशी जवळीक वाढवली?

कदम यांनी पुढे बोलताना युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. आता आदित्य ठाकरे बाहेर पडलेत, पण तेच जर अडीच वर्षांत आमदार-खासदार, मंत्र्यांना भेटला असता त्यांची सुखं-दुःख समजून घेतली असती, तर ही वेळ आली नसती. आमदारांना बदनाम करण्यापेक्षा तुम्ही अडीच वर्षांत पक्षासाठी, आमदारांसाठी काय केले, आता सर्वांना मातोश्रीचे दरवाजे उघडे केले आहेत, मग अडीच वर्षांत असे का केले नाही, असा सवालही रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.

Ramdas kadam - uddhav thackeray
'ते' पैसे उसने घेतले होते : कमिशनखोरीच्या नव्या आरोपांवर आमदार मिटकरी यांचा खुलासा

महाराष्ट्रभर दौरे करणार :

दरम्यान, गणपती विसर्जनानंतर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करणार आहे. या दौऱ्यामध्ये स्वतः सभा घेणार आणि गद्दार कोण आहेत, खोके कोणाकडे आहेत, कसे घेतले, एवढ्या खोक्यांची मिठाई खाऊन यांना डायबेटिस पण कसा होत नाही, हे महाराष्ट्रात जाऊन सांगणार आहे, यांना उघडं पाडणार आहे. असा इशारा रामदास कदम यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in