'अजितदादांनी सांगितलं त्याला मतदान केलं', राऊतांनी आरोप केलेला आमदार नेमकं काय म्हणाला?

मला अजितदादांनी ज्यांना मतदान करायला सांगितलं होतं त्यांना मी मतदान केलं अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे.
'अजितदादांनी सांगितलं त्याला मतदान केलं', राऊतांनी आरोप केलेला आमदार नेमकं काय म्हणाला?
rejecting sanjay raut claim shyamsundar shinde said i voted for same candidate as ajit Pawar told me

नांदेड: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी दगा दिला असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होती. ज्यामध्ये त्यांनी तीन अपक्ष आमदारांची नावं देखील होती. ज्यापैकी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde)यांचं त्यांनी थेट मीडियासमोर नाव घेतलं होतं. आता याच श्यामसुंदर शिंदे यांनी राऊतांच्या आरोपाला उत्तर देताना असं म्हटलं आहे की, अजितदादांनी सांगितलं त्याला मी मतदान केलं!

राज्यसभा निवडणुकीत दुसरा उमेदवार पडल्याने शिवसेना प्रचंड नाराज आहे. आपल्यासोबत अपक्षांकडून दगा झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. अशावेळी आता ज्यांची नावं संजय राऊत यांनी घेतली आहेत त्यांनी आता आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी श्यामसुंदर शिंदे यांनी आपली बाजू मीडियासमोर स्पष्ट केलं आहे.

पाहा श्यामसुंदर शिंदे नेमकं काय म्हणाले:

'मी आघाडीचा आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सहयोगी सदस्य आहे. कोणाला मतदान करावं याबाबत पक्षांतर्गत चर्चा होत असते. त्यावेळी पक्ष श्रेष्ठींनी आघाडीच्या तीन लोकांचं नाव दिलं होतं. पाच उमेदवार होते त्यावेळी पाच पैकी 3 कोणाला मतं द्यायची ते मी दिलेले आहेत.' असं श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

'संजय राऊत हे फार सीनियर आहेत, विद्वान आहेत. रामायण आणि महाभारत हे आपले दोन कथानक आहेत. रामायणात राम आणि रावण.. तर महाभारतात कौरव आणि पांडव. हस्तिनापूरमध्ये राहत होते कौरव-पांडव आणि युद्ध कुरुक्षेत्रामध्ये झालं. तेव्हा संजय नावाची एक अद्भुत व्यक्ती होती. त्यांना हस्तिनापूरला बसून कुरुक्षेत्रावर काय चाललंय हे दिसत होतं. कोणी कोणाला मारलं, कोणाची सरशी होतेय वैगरे.. हे त्यांना दिसत होतं आणि ते धृतराष्ट्र यांना सांगायचे.'

'अशीच विद्या ही यांनाही प्राप्त झाली असेल तर मला आनंद आहे या गोष्टीचा. जगात कुठे-कुठे काय-काय घडतं हे संजय राऊत साहेबांनी सांगितलं तर फार चांगलं होईल.' असा खोचक टोला यावेळी श्यामसुंदर शिंदे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

rejecting sanjay raut claim shyamsundar shinde said i voted for same candidate as ajit Pawar told me
'हा गाढवपणा संजय राऊतच करू शकतात', भाजप खासदार अनिल बोंडेंची घणाघाती टीका

'प्रश्न असा आहे की.. इंदिरा गांधी या जेव्हा सत्तेत होत्या तेव्हा त्यांनी निवडणुकीची व्याख्या अशी केली होती की, निवडणूक हा परस्पर विश्वासाचा भाग असतो. गुप्त मतदान आहे. यावेळी मोठ्या पक्षाच्या आमदारांनाच फक्त मतदान दाखवायचं होतं. उरले होते 50 आमदार ज्यांना मतदान दाखविण्याचा प्रश्नच नव्हता.'

'त्या 50 आमदारांपैकी कोणी कोणाला मतदान दिलं हे संजय राऊत यांना माहित असेल मग ते नक्कीच महाभारतातील संजय आहेत अशी माझी भावना आहे.' असं म्हणत श्यामसुंदर शिंदे यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

'मी महाविकास आघाडीलाच मत दिलं आहे. जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील आहेत अजित पवार साहेब आहेत. त्यांना विचारा... त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीला मतदान करा मी सहयोगी सदस्य आहे. माझं काय चुकलं असेल तर ते मला जाब विचारतील.' असं ठामपणे श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in