Sanjay Raut : “राज्यपालांची बिस्किटं न खाता विचारा का रे शिवरायांचा अपमान करता?”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं विधान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भागावर केलेल्या दावाने महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत असून, शिंदे गट आणि भाजप बचावात्मक पावित्र्यात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी भाजपला सुनावलं आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांना हटवण्याच्या मागणीवर त्यांनी जोर दिला. संजय राऊत म्हणाले, “राज्यपालांवर कारवाई करावी लागेल. अरे ला कारे ची भाषा जे म्हणताहेत, त्यांनी आधी राज्यपालांवर कारवाई करावी. मुंबई भाजपचे अध्यक्ष सांगत होते की, कर्नाटकच्या अरे ला कारे करू. हा त्यांचा नेभळटपणा आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्किटं न खाता, त्यांना विचारा की का रे शिवरायांचा अपमान करता? हे आधी तिथे विचारा. मग बाकीचं बघा. पण, तुमच्या मनगटात तेवढी हिंमत नाही.”

“रोज उठताहेत आणि शिवरायांची बदनामी करताहेत. रोज उठताहेत छत्रपतींचा इतिहास तुडवताहेत. अख्ख्या जगाला माहितीये की, छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला. महाराष्ट्रातील लहान लेकरं सांगतील की, शिवनेरीवर महाराष्ट्राचा राजा जन्माला आला. काल भाजपने शोध लावला की शिवनेरी नाही. शिवनेरी इतिहासातून काढून टाकलं या लोकांनी. छत्रपतींचा जन्म महाराष्ट्रातच झालाय हे तरी मान्य आहे का आपल्याला? छत्रपती जन्माला आले होते, हे तरी आपण स्वीकारताय का?”, असा प्रश्नांचा भडीमार खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निंबाळकर-पाटील भावकीत कधी पडली संघर्षाची पहिली ठिणगी? दोन पिढ्यांतील ‘रक्त’रंजित इतिहास!

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द

मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावला जाणार होते. मात्र, कर्नाटक सरकारकडून सध्या बेळगावात न येण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “कबड्डी नावाचा खेळ महाराष्ट्रात आहे. त्याला एक टच लाईन असते. या दोन मंत्र्यांनी किमान सीमारेषेला टच तरी करून यावं. बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा, पण तिकडे सीमेवर जा तरी”, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

ADVERTISEMENT

अमोल कोल्हे ‘आत्मक्लेश’ आंदोलनात का नव्हते? भाजपच्या बड्या नेत्यासोबतचा फोटो समोर

ADVERTISEMENT

“यांच्यात हिंमत नाही. हे हतबल, लाचार लोक आहेत. हे काहीही करू शकत नाही. हे फक्त बोलतात. आम्हाला शिव्या घालतात. त्यांनी बोम्मईंना शिव्या घालाव्यात. बोंबलावं त्यांच्या नावाने. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात. घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला सुरक्षा आहे. त्यांनी जायला पाहिजे. घुसायला पाहिजे”, अशा शब्दात राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT