"तुम्ही रामाच्या बाजूचे की, रावणाच्या?", असं विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी दिलं उत्तर

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis : बूस्टर डोस सभेत फडणवीसांनी केलेल्या प्रश्नाला राऊतांचं प्रत्युत्तर
"तुम्ही रामाच्या बाजूचे की, रावणाच्या?", असं विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी दिलं उत्तर

हनुमान चालीसा पठणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बूस्टर डोस सभेत फडणवीसांनी 'तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या?,' असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊतांना देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभांबद्दल विचारण्यात आलं. सर्व मुद्द्यांवर राऊतांनी भूमिका मांडली.

"तुम्ही रामाच्या बाजूचे की, रावणाच्या?", असं विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी दिलं उत्तर
'बाबरी पडली तेव्हा राज कुठे होते?'; उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर

राऊत म्हणाले, "किती काळ बाबरी ढाच्यावर बोलणार आहात? महाराष्ट्रात आणि देशात महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत असंख्य प्रश्न आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी असो किंवा चीनने केलेली घुसखोरी यावरून लक्ष हटवण्यासाठी पुन्हा एकदा हनुमान चालीसा, बाबरी मशीद यावर भाजप आणि त्यांचे समविचारी हे सातत्याने बोलत आहेत."

"या देशातील लोकांचे प्रश्न पहा. किती बेरोजगारी वाढलीये. महागाईचा कसा स्फोट झालाय. चीनचे लोक घुसलेत, त्यांना बोला. दम द्या. विषय बाबरीचा असेल आणि कुणी म्हणत असतील की, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? असं म्हणणाऱ्यांनी त्यांच्याच पक्षातील तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं," असा उलट सवाल राऊतांनी फडणवीसांना केला.

"तुम्ही रामाच्या बाजूचे की, रावणाच्या?", असं विचारणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी दिलं उत्तर
भोंगे उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात...; फडणवीसांचा ठाकरेंवर वार

"त्याकाळातील सीबीआयचा अहवाल तपासा. सीबीआयने याचा तपास केला आहे. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं यांनी तपासावी. गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. शिवसेना कुठे होती म्हणणारे जे अज्ञानी लोक आहेत, त्यांना यात कळेल की, त्यावेळी शिवसेना कुठे होती. काय करत होती, हे त्यांना कळेल," असंही राऊत यावेळी म्हणाले.

"वातावरण बदललेलं आहे. तो विषय कशाला काढता. प्रश्न बदलेले आहेत. अशा वेळी मूळ प्रश्नांवरील लक्ष दूर करण्यासाठी भाजप आणि त्यांचे गुप्त साथीदार हे सगळे याविषयाकडे लोकांना आकर्षित करताहेत."

"भोंगे हा विषय नाही. भोग्यांपेक्षाही महत्त्वाचे विषय या देशात आहेत. या भोंग्यामागची ईलेक्ट्रिसिटी कुणाची आहे. हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही. हा कायद्याच्या चौकटीतील विषय आहे. तुम्हाला काहीच काम नसल्यानं तुम्ही यावर बोलत आहात. तुम्ही महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी खराब करत आहात," अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.

"आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये. आम्ही त्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत. लढाई केलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले आहेत. या देशात कायद्याचं राज्य असेल, तर प्रत्येकानं त्याचं पालन केलं पाहिजे."

"त्यांनी पुन्हा एकदा रामायण वाचलं पाहिजे. रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत हा अंहाकारामुळे झाला. रावण विद्वान, हुशार योद्धा होता. रावण धारातिर्थी पडला, तो त्याच्या अंहकारामुळे. काही लोकांना सत्ता असल्याचा अंहकार असतो, तर काही सत्ता गमावल्यानंही एक वेगळा अंहकार निर्माण होतो. आता कोणत्या अंहकारातून कोण कुणाला रावण म्हणतंय हे बघितलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे, त्यांनी त्यांचा अंत करावा. मग महाराष्ट्र, देशाच्या प्रश्नावर बोलावं,' असं उत्तर राऊतांनी फडणवीसांच्या टीकेला दिलं.

Related Stories

No stories found.