'...नाहीतर मी गप्प बसलो असतो का?'; राऊतांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता

महाविकास आघाडी असल्यामुळे काही बंधन पाळावी लागतात... वातावरण, विद्यमान खासदारांनाच आव्हान
'...नाहीतर मी गप्प बसलो असतो का?'; राऊतांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज आपला मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला धडकी भरवणारी भूमिका घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात लांडेवाडी येथे बोलत असताना संजय राऊत यांनी, काहीही झालं तरी शिवाजी आढळरावांना आम्ही संसदेत घेऊन जाऊ असं वक्तव्य केलं आहे.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढलेल्या अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या शिवाजी आढळरावांचा पराभव केला होता. शिवसेनेला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला असून यानंतरही राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुण्यात या दोन्ही नेत्यांमधलं वाकयुद्ध चांगलंच रंगलं होतं. आज आंबेगाव तालुक्यात बोलत असताना संजय राऊतांनीही नाव न घेता अमोल कोल्हेंचा समाचार घेत शिवाजी आढळरावांना आम्ही संसदेत घेऊनच जाऊ असं म्हटलं.

"आज आपल्याकडे इथं खासदार आणि आमदार नाहीत. म्हणून उमेद हरू नका. कारण आज नाहीत म्हणजे उद्या नसणार असं नाही, हे लक्षात असू द्या. कारण हे राजकारण अन मतदार ही चंचल असतात. गंगुबाई काठेवाडी सिनेमा पहा, आम्ही सिनेमे फार पाहतो. शिवाजी आढळराव हे 24 बाय 7 ऍक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला. आता महाआघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का?" असा सवाल राऊतांनी विचारला.

यापुढे बोलताना राऊतांनी, "माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे. इकडची दुनिया तिकडे करू. हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार... आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील यांना संसदेत घेऊन जाऊ", असं स्पष्ट मत कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप जाहीर प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास शिरुर लोकसभेची जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीत वादाचा मुद्दा ठरणार असं दिसतंय.

'...नाहीतर मी गप्प बसलो असतो का?'; राऊतांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता
कार्यकर्त्यांची धरपकड होते आणि हे गॅलरीत ये-जा करतात: अजितदादांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं

Related Stories

No stories found.