Sanjay Raut: ‘राहुल गांधींना ते भांडण मिटवायचेय’, सांगितला खास किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut RokhThok : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) जम्मूमध्ये (Jammu) भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले. राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi) चालले. त्यानंतर राऊतांनी रोखठोक (Rokhthok) सदरातून काँग्रेस नेते (Congress Leader) राहुल गांधींचं कौतुक केलं. त्याचबरोबर जम्मूमध्ये काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) बाळासाहेब ठाकरेंबद्दल (Balasaheb Thackeray) व्यक्त केलेल्या भावनांचाही किस्सा सांगितला आहे. (MP Sanjay Raut Praises congress Leader rahul gandhi)

संजय राऊत रोखठोकमध्ये लिहितात, “राहुल गांधी चालत आज काश्मिरला पोहोचले. राहुल गांधींच्या यात्रेनं राजकारणाचं ‘नरेटिव्ह’ (कथानक) बदललं आहे. काश्मीरचं सत्य समोर आले. हिंदू-मुसलमानांना विचार करायला भाग पाडले. देशाच्या विषयांवर चर्चा सुरू झाली. देश जोडण्यासाठी मातीवर चालावे लागते. राहुल गांधी चालत आहेत.”

पुढे राऊत म्हणतात, “1947 चा भारत-पाक झगडा जमिनीवरून झाला व शेवटी देश तुटण्यापर्यंत गेला. हे विभाजन आणि फाळणीच्या जखमाही कशा ते जम्मूत पाहिले. श्रीनगरपासून पाकिस्तानची सीमा 310 किलोमीटर; पण जम्मूच्या विमानतळापासून भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा फक्त 20 मिनिटांवर. 21 तारखेच्या संध्याकाळी मी तेथे पोहोचलो तेव्हा सैनिकांची परेड सुरू होती. उत्साहाचे वातावरण होते. पर्यटकांची गर्दी होती. तेथे ‘नो मॅन्स लॅण्ड’ आहे. त्यावरून पुढे गेलो. तेव्हा तेथील आपल्या अधिकाऱ्यांनी तेथील शेती व जमिनीचे वाटप कसे झाले ते सांगितले.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

राहुल गांधींना ते भांडण मिटवायचेय -संजय राऊत

“तेथे सीमेवर एक विशाल पिंपळाचा वृक्ष आहे.

ADVERTISEMENT

‘या झाडाचीही वाटणी झालीय.’

ADVERTISEMENT

“कशी?”

‘हा इकडला भाग आपला. पलीकडच्या फांद्या त्यांच्या.’

हे ऐकून अस्वस्थ झालो. या गावातल्या गायी, बैल चरायला पाकिस्तानच्या हद्दीत जातात व संध्याकाळी पुन्हा घरी परत येतात. त्यांच्यासाठी दोन्ही देश सारखेच! माणूसच भांडत बसलाय. राहुल गांधींना ते भांडण मिटवायचेय”, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

काश्मिरी तरुण आणि बाळासाहेब ठाकरे, राऊतांना काय अनुभव आला?

संजय राऊत म्हणाले, “काश्मिरी पंडितांनी खोऱ्यात जाऊन नोकरीवर रुजू व्हावे असं सरकारचं फर्मान आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार सरकारनं बंद केल्यानं आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मी जम्मूत त्यांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या जयजयकाराच्या घोषणा तेथे गरजल्या. त्या आंदोलनात निवेदन करणारे अनेक तरुण मराठी बोलत होते.”

Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्का! पक्ष फुटला आता पक्ष कार्यालयही गेलं!

“तुम्ही मराठी कसे बोलता? असे मी विचारले तेव्हा ते तरुण म्हणाले, ‘ही सर्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची कृपा. त्यांनी कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे उघडले. आमच्या मुलांना उच्च शिक्षणात राखीव जागा ठेवल्याने आम्ही मुंबई-पुण्यात येऊन शिकलो. डॉक्टर, इंजिनीयर्स झालो. बाळासाहेब आणि शिवसेनेने आमच्यासाठी जे केले ते कधीच विसरता येणार नाही!’ असे भारावलेले उद्गार त्यांनी काढले.”

“शिवसेनाने हमारे लिए दिल के दरवाजे खोले.’ असे तो शेवटी म्हणाला. पण 370 हटवल्यानंतरही कश्मिरी पंडितांची घरवापसी होऊ शकलेली नाही. आजही कश्मीर एक बंदिवान नंदनवन आहे”, अशी खंत संजय राऊतांनी हा प्रसंग सांगताना व्यक्त केलीये.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT