'राज्यपाल, हे काय सुरू आहे?'; घटनेच्या 'कलम १६४'वर बोट ठेवत संजय राऊतांचा कोश्यारींना सवाल

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून संजय राऊतांचा थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सवाल
'राज्यपाल, हे काय सुरू आहे?'; घटनेच्या 'कलम १६४'वर बोट ठेवत संजय राऊतांचा कोश्यारींना सवाल

शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्तेत आलं, मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात आहे. यावरूनच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे समर्थक आमदारांचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. राज्यात नवं सरकार येऊन दोन आठवडे उलटले असून, अनेक महत्त्वाचे निर्णय नव्या सरकारने घेतले आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार लांबत चालला असताना सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

'राज्यपाल, हे काय सुरू आहे?'; घटनेच्या 'कलम १६४'वर बोट ठेवत संजय राऊतांचा कोश्यारींना सवाल
Maharashtra Cabinet : २० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार? १० ते १२ मंत्र्यांना शपथ दिली जाणार?

याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सवाल केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसताना सध्या सरकारकडून घेतले जात असलेले निर्णय वैध नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारतीय घटनेतील कलम १६४, १ अ चा फोटो शेअर केला आहे. कलम १६४, १अ चा संदर्भ देतच संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न विचारला आहे.

'राज्यपाल, हे काय सुरू आहे?'; घटनेच्या 'कलम १६४'वर बोट ठेवत संजय राऊतांचा कोश्यारींना सवाल
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना शिंदे-फडणवीस सरकारची मंजुरी

संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोणता प्रश्न विचारला?

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात, "भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचं असणं बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय, त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरू आहे?."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यापासून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णयही बदलण्यात आले आहेत.

आज झालेल्या बैठकीतही सरकारने औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रश्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in