सत्यजित तांबेंचा खळबळजनक गौप्यस्फोट! नाना पटोलेंचं प्रदेशाध्यपद धोक्यात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

satyajeet Tambe shocking revelation about Nashik garaduate election 2023 : नाशिक पदवीधरवरून रंगलेल्या काँग्रेसतंर्गत राजकारणाबद्दल आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट केला. चुकीचे एबी फॉर्म (AB Form), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी हे पक्षातील नेत्यांकडून षडयंत्र होतं आणि मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न झाले, असं म्हणत सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीकडे प्रदेश कार्यकारिणीवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे नाना पटोले (Nana Patole) यांचं प्रदेशाध्यक्षपदच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालीये. (Satyajeet Tambe serious allegations on nana patole)

एबी फॉर्म, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सत्यजित तांबे काय म्हणाले? वाचा…

-गेले 20-25 दिवस आपण नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं राजकारण झालं. त्यावर खरंतर, अनेकांनी मला प्रश्न विचारले गेले. त्याबाबतीत भूमिका मांडायची होती. अनेक आरोप आमच्या परिवारावर झाले. आपण ज्या पक्षात आयुष्यभर राहिलो. मी अनेकवेळा सांगितलं की, आमच्या कुटुंबाला 2030 साली काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होताहेत. किती निष्ठेनं आम्ही या पक्षात काम केलंय, हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला.

-मी 2000 मध्ये काँग्रेस पक्षाच्या युवक विद्यार्थी संघटनेच्या (National Students Union of India) माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये मला एनएसयूआय (National Students Union of India)चं प्रदेश सचिवपद देण्यात आलं. तिथून मी काम केलं. 2007 ते 2017 या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2007 ला तत्कालीन युवक काँग्रेसचे आमचे नेते राजीव सातव यांनी विद्यार्थी चळवळीतून युवक काँग्रेसमध्ये आणलं. 2011 ची युवक काँग्रेसची निवडणूक राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सगळ्या विचारांवर विश्वास ठेवून लढलो. 2014 ची निवडणूक लढलो आणि जिंकलो. 2018 मध्ये मी पुन्हा निवडणूक लढलो आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

-2018 ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्यात काँग्रेसची स्थिती वाईट होती. आव्हानात्मक परिस्थितीत मी अनेक उपक्रम राबवले. मी संघटन बांधण्याचं काम प्रामाणिकपणे केलं. त्याची दखल पक्षाकडून घेतली गेली. 2022 मध्ये युवक काँग्रेसची माझी कारकीर्द संपली. 2019 मध्ये लोकसभेत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. कार्यकर्त्यांचं मनोबल खचलेलं असताना मी पहिला कार्यकर्ता होतो की ज्याने दादरच्या टिळक भवनला बैठक घेतली होती.

-2019 ची विधानसभा निवडणूक कशी लढवायची याची तयारी केली. सुपर 60 सारखा प्रयोग केला. 28 जागांवर युवक काँग्रेसचं योगदान आहे. माझ्यावर 50 पेक्षा अधिक केसेस होत्या. पासपोर्ट मला मिळत नव्हता. आता राज्य शासनाने जीआर काढला आणि 31 डिसेंबर 2021 च्या केसेस मागे घेतल्या. चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे.

ADVERTISEMENT

-युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर त्या व्यक्तीला विधानसभा, राज्यसभा अशा पद्धतीने त्याला संधी देण्याचा प्रयत्न पक्षाकडून होतं. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्यांना राज्यसभेवर घेतात. राज्य पातळीवर काम करणाऱ्यांना विधान परिषदेत घेतात.

ADVERTISEMENT

-ज्या ज्या वेळी मी पक्षश्रेष्ठींकडे जायचोआणि कुठेतरी संधी द्या, असं सांगायचो. त्या त्या वेळी मला सांगितलं जायचं की, तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत. म्हणून तुम्हाला विधान परिषद देता येणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघ माझ्या वडिलांनी अत्यंत कष्टाने बांधलेला मतदारसंघ आहे. 2009 हा भाजपचा बाल्लेकिल्ला आम्ही अपक्ष म्हणून खेचून आणला. त्यानंतर सातत्यानं त्यांनी ते टिकवण्याचं काम केलं.

-आम्ही पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन आम्ही संबंध टिकवण्याचं काम केलं. काही महिन्यांपूर्वी असं झालं की, मी प्रभारी एच. के. पाटील यांना दिल्लीत भेटलो. त्यांना संधी देण्यास सांगितलं. मी त्यांना सांगितलं की, मलाही कुठेतरी संधी द्या. संघटनेत संधी द्या. एखादं पद द्या. जबाबदारी द्या.

-दुर्दैवाने तसं झालं नाही. मला असं सांगितलं गेलं की तुमच्या वडिलांच्या जागेवरून विधान परिषदेची निवडणूक लढा, असं एच.के. पाटील मला म्हणाले, तेव्हा मला संताप आला. मी त्यांना सांगितलं की, माझ्या वडिलांच्या जागेवरूनच निवडणूक लढवायची असेल, तर 22 वर्षे काम केलं. पक्षाने संधी द्यावी असं मी त्यांना सांगितलं.

-स्वतःच्या हिंमतीवर करायचं या भावनेतून काम करत होतो. ही सगळी चर्चा सुरू असताना पदवीधरची निवडणूक आली. माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना बोलावलं. मला वाटतं होतं की, शहर विकासाचा मुद्दा राजकारणापलीकडे घेऊन जायला हवं.

-तिथं देवेंद्रजींनी सांगितलं की, सत्यजितला संधी द्या, नाहीतर आमच्या त्याच्यावर डोळा आहे. त्यानंतर एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली. माझ्या कार्यकर्त्यांची भावना देवेंद्रजींनी बोलून दाखवली.

-निवडणूक जाहीर झाल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं की, ही निवडणूक तू लढवावी. वडिलांच्या जागेवर मला उभं राहायचं नव्हतं. नंतर आम्ही घरात चर्चा केली. बाळासाहेब थोरातही होते. त्यानंतर ठरवलं की, सत्यजितने निवडणूक लढवावी. त्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठीला कळवलं. कोण लढणार हे आम्ही शेवटच्या क्षणी ठरवू असंही आम्ही एच. के. पाटील यांना सांगितलं.

-त्यानंतर निवडणुकीच्या एकदोन दिवस आधी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यापूर्वी 9 जानेवारीला प्रदेश कार्यालयाशी एबी फॉर्मसाठी संपर्क केला. माझा माणूस नागपूरला गेला. 10 जानेवारी पोहोल्यानंतर 10 तास मी बसून होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा माझ्या वडिलांना फोन आला की, अमूक एका व्यक्तीकडे आम्ही एबी फॉर्म देतोय.

-माझा माणूस दोन एबी फॉर्म घेऊन निघाला. ते एबी फॉर्म सीलबंद होते. 11 तारखेला माणूस इकडे पोहोचला. ज्यावेळी आम्ही फॉर्म भरायला सुरूवात केली आणि फॉर्म बघितले त्यावेळी लक्षात आलं की, एबी फॉर्म चुकीचे आहेत. ते एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाही, हे आम्हाला कळलं. एक एबी फॉर्म औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा होता आणि दुसरा होता नागपूर शिक्षक मतदारसंघाचा.

-एबी फॉर्म सारखी महत्त्वाची गोष्ट पण प्रदेशाध्यक्षांनी इतका गहाळपणा केला? आजपर्यंत प्रदेश कार्यालयाने एकदाही मान्य केलं नाही की चुकीचे फॉर्म दिले. मला जर भाजपकडून निवडणूक लढवायची असती, तर प्रदेश कार्यालयाला कळवलंच नसतं की, चुकीचे एबी फॉर्म दिले गेले.

-दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या फॉर्मवर सुधीर तांबे यांचं नाव होतं. त्यात पर्यायी उमेदवारांचं नावच नव्हतं. इतकी मोठी चूक प्रदेश कार्यालयाने केली, मग काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेसवर काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे.

-माझा स्पष्टपणे आरोप आहे की, आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्सर, जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं गेलं. त्याची स्क्रिप्ट तयार होती. माझ्या माणसाला बोलावलं गेलं, 10 तास बसवून ठेवलं. चुकीचे फॉर्म दिले.

-मी नंतर ऐकलं की, निर्णय तर तांबे परिवाराला घ्यायचा होता. मग बरोबर 12.30 वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर करण्यात आली? माझे वडील सांगताहेत की मला उभं राहायचं नाही, माझ्या मुलाला द्या. तर माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर केली. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा एकही उमेदवार दिल्लीतून जाहीर झाला नाही, मग हीच का? हे सगळं बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेंना उमेदवारी मिळू नये यासाठी, आमच्या परिवाराला पक्षाच्या बाहेर ढकलण्याचं षडयंत्र असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

-मी ज्यावेळी फॉर्म भरला. त्यादिवशी मी एच. के. पाटील यांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. नाना पटोले यांचा फोन बंद होता. थोरातांना फोन केला. त्यांचं टाके काढण्याचं काम सुरू होतं. त्यांनी मला सांगितलं की आपल्याला काँग्रेसकडूनच लढायचं आहे. मीही त्यांना सांगितलं की, काँग्रेसकडून लढायचं पण एबी फॉर्मची तांत्रिक अडचण आहे.

-त्यांनी कोऱ्या एबी फॉर्मबद्दल सांगितलं. मी त्यांना त्या कोऱ्या एबी फॉर्मबद्दल सांगितलं. त्यांनी एच. के. पाटलांना बोलायला सांगितलं. एच.के. पाटलांनी फोन घेतला नाही. थोरातांनी सांगितलं की हे मला पटत नाहीये. शेवटी मी काँग्रेस नावानं फॉर्म भरला होता, अपक्ष नाही. एबी फॉर्म जोडू न शकल्यानं अर्ज अपक्ष म्हणून लिस्ट झाला.

-माध्यमांनी आणि इतरांनी त्याची शहानिशा न करता अपक्ष भरला अशी भूमिका मांडली. अर्ज भरल्यानंतर मी सांगितलं होतं की, काँग्रेसचा उमेदवार आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं होत की मविआ म्हणून अर्ज भरला. पण, तिथून भाजप पाठिंबा देणार अशी स्क्रिप्ट पक्षातंर्गत तयार झालेली होती, तिला बळ देण्याचं काम काही लोकांनी केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT