Shiv Sena : तर धनुष्यबाण कायमचा… उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अकोला : शिवसेना कोणाची? या प्रश्नावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात मंथन सुरु आहे. या प्रकरणात १० जानेवारीच्या सुनावणीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युक्तीवाद केला होता. तर मंगळवारी (१७ जानेवारी) झालेल्या सुनावणीत शिवसेना (UBT) गटाने युक्तीवाद केला. यानंतर आता याबाबतची पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

याच दरम्यान, ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी शिवसेना कोणाची? या प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी अद्याप आणखी काही दिवस लागू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी निकम यांनी ठाकरे गटाच्या चिंतेत भर टाकणारं एक वक्तव्य केलं आहे.

निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागत असेल तर कदाचित आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते, अशी शक्यता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे. ते अकोला येथे एका खटल्यासंदर्भात आले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले उज्ज्वल निकम?

ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षांचे राजकीय चिन्ह किंवा त्या राजकीय पक्षाच्या चिन्हाबाबत प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी निवडणूक आयोग प्रामुख्याने संबंधित राजकीय पक्षाची घटना आणि त्या घटनेनुसार त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी निवडून आले आहेत का? ते कोणाच्या बाजूने आहेत? ही बाब तपासते.

त्या राजकीय पक्षाचे आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे कोणत्या गटाचे जास्त आहेत हे देखील तपासले जाते. निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटातून अनेक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. या प्रतिज्ञापत्रात दावे-प्रतिदावे देखील तपासल्या जातात. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला निश्चितपणे ही बाब तपास करावी लागेल की, हे प्रतिज्ञापत्र खरे आहे की खोटे आहेत. त्यात सत्याचा लवलेश किती आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो, असेही निकम यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्षांच्या काही आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी बाब स्पष्ट केली आहे की शिवसेनेत राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाला असावं याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग करेल. त्यामुळे त्या आमदारांच्या सोळा आमदारांच्या पात्रता किंवा अपात्रच्या हा निवडणूक आयोगा पुढचा विषय राहणार नाही.

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाची घटना आणि निवडून आलेली लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूचे आहेत ही बाब तपासावी लागेल. या सगळ्या प्रक्रियेला जर वेळ लागत असेल तर कदाचित केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेनेचे राजकीय चिन्ह धनुष्यबाण हे कायमचं गोठवू शकते. त्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT