शिवभोजन थाळी ते पोलीस भरती! जाणून घ्या शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीतले सगळे महत्त्वाचे निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची? यावर सुनावणी सुरू आहे. अशात महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. शिवभोजन थाळी सुरू ठेवणं, पोलीस भरती करणं असे अनेक महत्त्वाचे निर्णय आज बैठकीत घेण्यात आले. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत १४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

काय आहेत २७ सप्टेंबरला घेतलेले निर्णय?

राज्यात फोर्टिफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करणार

राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही विकास मंडळाचं पुनर्गठन होणार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी राज्य शहर नियोजन संस्थेसाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना येणार

पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधली सर्व रिक्त पदं भरण्यासाठी पदभरती निर्बंधांमधून सूट, एकूण वीस हजार पदं भरणार

ADVERTISEMENT

इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्त विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहं सुरू करणार

ADVERTISEMENT

इतर मागासवर्गी, वि.जा. भ.ज. आणि वि. मा. प्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ, सध्या ५० विद्यार्थ्यांना मिळणार

उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवणार, शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमान तळ असं नाव देणार

एअर इंडियाकडून एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीस हस्तांतर होणाऱ्या ५० एकर जमिनीवरच्या मुल्यांवरील मुद्रांक शुल्क माफ

महाराष्ट्र विनाअनुदानीत खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम सुधारणेचे विधेयक मागे घेणार, दुरूस्तींसह पुन्हा लागू करणार

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१ मागे घेण्याचा निर्णय

दुय्यम न्यायालयीत न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करणार

राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयीत पूर्ण ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण निर्देशकांना सातवा वेतन आयोग लागू

वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांचा वणवा, प्राणी हल्ला, तस्कर-शिकारी यांच्या हल्ल्यात, वन्य प्राण्यांचा बचाव करताना मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास वारसांना लाभ दिला जाणार.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT