शरद पवार मोठे नेते असले तरी…; शहाजी बापूंनी सांगितलं बारामती लोकसभा मतदारसंघाचं भविष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली: राजकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे शहाजी बापू पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असताना, शरद पवारांना एक निवडणूक फार घासली होती, हे सुद्धा विसरता येणार नाही असेही बापू यावेळी म्हणाले.

50 खोके ओकेवरती काय म्हणाले शहाजी बापू

विरोधक सतत शिंदे गटातील आमदारांवरती 50 खोके एकदम ओके अशी टीका करत आहेत. त्याला शहाजी बापू पाटलांनी उत्तर दिलं आहे. ”इथे आम्हाला पेटी बघायला मिळाली नाही, मात्र विरोधक खोक्याच्याबाबत चुकीची टीका करत आहेत. राजकीय क्रांती घडल्यामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीचे नेते त्रस्त होऊन आमच्यावर टीका करत आहेत. ठाकरे गटातील आणखीन काही आमदार दसरा मेळाव्याच्या वेळी, शिंदे गटात येण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये जमीन असमानता फरक असून, महाविकास आघाडीची सत्ता असतानाची कामे झाली नाहीत, मुख्यमंत्री शिंदे असताना होत आहेत, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचं प्लॅनिंग

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि विशेष: म्हणजे पवार घराण्याचं वर्चस्व असलेल्या या मतदार संघामध्ये भाजप तयारीला लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. २३ सप्टेंबरपासून निर्मला सितारामन या देखील बारामती दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे अनेक नेते म्हणत आहेत बारामतीत शरद पवार यांना कोणी पाडू शकत नाही. त्यावरुनच शहाजी बापूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी यांची उदाहरणं देत शरद पवारही पराभूत होतील याचे संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील १६ मतदार संघ भाजपच्या निशाण्यावर

मध्य मुंबईत केंद्रीय मंत्री अनुरागसिंग ठाकूर, दक्षिण मुंबईमध्ये नारायण राणे, पालघरमध्ये विश्वेश्वर तुडू, रायगड आणि शिर्डी मतदारसंघात प्रल्हाद पटेल, बारामतीला निर्मला सीतारमण, औरंगाबाद आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भूपेंद्र यादव, चंद्रपूरला हरदीपसिंग पुरी या मतदार संघांवरती भाजपचं विशेष लक्ष असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT