'सभेच्या दिवशी आम्ही कोणीही साहेबांच्या...', शर्मिला ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंविषयी 'हा' किस्सा

Sharmila Thackeray: राज ठाकरे हे आपल्या जाहीर सभेची तयारी कशी करतात याबाबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीच एक किस्सा सांगितला आहे.
'सभेच्या दिवशी आम्ही कोणीही साहेबांच्या...', शर्मिला ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंविषयी 'हा' किस्सा
sharmila thackeray told a special anecdote before raj thackerays public meeting(फाइल फोटो)

मुंबई: राज ठाकरेंच्या सभा गाजतात. प्रचंड गर्दी जमते. विरोधी पक्षांवर राज ठाकरे अक्षरशः तुटून पडतात. सध्या तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण राज ठाकरेंच्या सभेभोवती फिरतंय. पण राज ठाकरे सभेची, भाषणाची तयारी कशी करतात, सभेदिवशी राज यांच्या हातापायाला घाम का फुटतो, याबद्दलचा नेमका काय किस्सा हे जाणून घेणार आहोत.

2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतल्या त्यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ' सभा खूप गाजल्या. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 2022 चा पाडवा मेळावा, तसंच ठाण्यातली उत्तर सभा राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे चर्चा होते आहे. पण यासभांआधी राज आपल्या भाषणाची तयारी कशी करतात, याचा किस्सा त्यांच्या पत्नीनेच सविस्तर सांगितला.

तसंच सभेआधी आपल्या हातापायांना घाम फुटतो, असं स्वतः राज ठाकरेंनी सांगितलं आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत सहभागी झाले होते. यावेळीच शर्मिला यांनी राज यांच्या सभेच्या तयारीचा किस्साच सांगितला.

राजसभेबद्दल शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या?

राज ठाकरे यांचं वाचन खूप आहे. सभा असते त्यावेळी त्यांच्या रुममध्ये आम्ही कोणीही जात नाही. कारण सभेच्या आधी ते वाचन करतात. त्यादिवशी काय बोलायचं याची तयारी सुरु असते. त्यामुळे आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब करत नाही. राज हे कधीच वाचून भाषण देत नाहीत. त्यांचं भाषण उत्स्फुर्त असतं.

राज ठाकरे यांनीही याच कार्यक्रमात आपल्या सभेच्या तयारीबद्दल माहिती दिली. तडाखेबंद भाषणांना विरोधकांच्या भंबेरी उडवून देणाऱ्या मनसेप्रमुखांच्या हातापायांना सभेआधी घाम फुटत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

ते म्हणाले, 'ज्या दिवशी माझी सभा असते, त्यावेळेला माझ्या हात-पायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात. कारण मला माहिती नसते की मी काय बोलणार ते. 100 गोष्टी जरी मला माहित असल्या तरी त्यावेळी माझ्या तोंडून काय येणार हे मला माहीत नसतं.'

'काही वेळेला नोट्स काढलेल्या असतात, पण त्याकडे माझं लक्ष जात नाही. बोलतो त्यावेळी मला काही दिसत नाही. जर एखादा महत्त्वाचा मुद्दा राहिला असेल तर पाठीमागून सांगितलं जातं.' असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

sharmila thackeray told a special anecdote before raj thackerays public meeting
औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरेंना झाली बाळासाहेबांच्या 'त्या' तीन सल्ल्यांची आठवण

आजही (1 मे) अगदी काही तासातच राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होणार आहे. राज ठाकरे यांच्या या सभेत ते नेमकं काय बोलणार याकडे सध्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

Related Stories

No stories found.