शरद पवार यांचं ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था- शंभुराज देसाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे.
शरद पवार यांचं ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था- शंभुराज देसाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. त्यांच्याच ऐकण्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची अनैसर्गिक युती उद्धव साहेबांनी केली. त्यामुळे दसरा मेळावा किंवा इतर सर्व बाबतीत पवार साहेबांना उद्धव साहेबांची अधिक चिंता असल्याचा टोमणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी लगावला आहे.

नितीन देशमुख यांना अडीच महिन्यानंतर जाग आली का?

नितीन देशमुखांनी त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या लाच प्रकरणाचा उल्लेख करत सत्तांतराबद्दल आपल्याकडे व्हिडीओ असल्याचं म्हणाले होते. त्यावर शंभुराज देसाई म्हणाले ''मी आत्महत्याच करेन, तुमचे व्हिडीओ व्हायरल करेल, अडीच महिन्यानंतर आता सुचले का. त्यांनी काय केलं नसेल तर चौकशीमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी होईल.''

शंभुराज देसाईंनी केली रामदास कदमांची पाठराखण

रामदास कदम यांनी दापोलीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरती टीका केली, त्यानंतर बरेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. आता रामदास कदमांचे सहकारी शंभुराज देसाईंनी कदमांची पाठराखण केली आहे. ''रामदास भाई जे बोलले ते त्यांना आलेल्या अनुभवातुन बोलले. रामदास कदम यांना जे अनुभव आले ते सत्य अनुभव समाजासमोर मांडण्याचे काम त्यांनी केलं आहे. ज्यांना कोणाला योग्य वाटलं नाही ते अशा पद्धतीने आंदोलन करू शकतात.''

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे आज पंढरपुर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी, दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, असे सांगत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सेनेलाही चिमटा काढला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in