'शिवसेना फक्त आपलीच'; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांसमोर गर्जना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुण्यातल्या शिवसैनिकांची भेट घेतली त्यावेळी ही गर्जना केली आहे
Shiv Sena is none other than ours, Uddhav Thackeray's roar in Mumbai
Shiv Sena is none other than ours, Uddhav Thackeray's roar in Mumbai फोटो सौजन्य - India Today

शिवसेना फक्त आपलीच इतर कुणाचीही नाही. दुसरी शिवसेना निर्माण होऊच शकत नाही अशी गर्जना आज शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पुण्यातल्या शिवसैनिकांनी आज शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हा निर्धार बोलून दाखवला आहे. उद्धव ठाकरे बोलत असताना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात पुण्यातल्या शिवसैनिकांनी घोषणाही दिल्या.

काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?

भाजपला शिवसेना नुसती फोडायची नाही तर संपवायची आहे. त्यांना शिवसेनेचं अस्तित्व नको आहे. शिवसेना संपवून ती बळकवायची आहे. मात्र इथे आज मला भेटायला आलेल्या प्रत्येकाने जोमाने कामाला लागा. तुमच्या मनात प्रश्न आहे की आपलं काय? मात्र आत्तापासून जिंकायची तयारी करा. मन घट्ट करा, आपण विजय मिळवू त्यासाठीच कामाला लागा.

Shiv Sena is none other than ours, Uddhav Thackeray's roar in Mumbai
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा शिवसैनिक छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे -भास्कर जाधव

उद्धव ठाकरे म्हणाले, 'बाण आपलाच'

शिवसेनेत दोन गट पडल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की धनुष्य-बाणाचं काय? तर धनुष्य बाण आपलाच आहे आणि आपलाच राहणार हा विश्वास बाळगा. आत्तापर्यंत ज्यांना जे काही देता येणं शक्य होतं तेवढं दिलं. मात्र ज्यांना दिलं त्यांनी काय केलं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. आत्ता माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाही. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपण ज्यांना दिलं ते निघून गेले आहेत. मात्र ज्यांनी दिलं ते तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. मी पराभवाने खचून जाणारा माणूस नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यावेळी शिवसेना फक्त ठाकरेंचीच या आशयाच्याही घोषणा देण्यात आल्या.

शिवसेनेत २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी २९ जूनला राजीनामा दिला. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्ष आणखी फुटू नये यासाठीची सर्वतोपरी काळजी घेत आहेत.

uddhav thackeray address to shiv sainik
uddhav thackeray address to shiv sainik

काल त्यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आज ते पुण्यातल्या शिवसैनिकांना भेटले. त्यावेळी शिवसेना फक्त आपलीच आहे आणि आपलीच राहणार हे सांगत शिवसैनिकांमध्ये चैतन्य भरलं. तसंच घाबरू नका, हरून जाऊ नका, खचून जाऊ नका, विजयाच्या तयारीला लागा असंही आवाहन केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in