Eknath Shinde: 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, आम्हाला...', एकनाथ शिंदेंच्या ट्विटनं खळबळ

डॉ. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचा मुलगा हे सगळे सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
Eknath Shinde: 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, आम्हाला...', एकनाथ शिंदेंच्या ट्विटनं खळबळ
Eknath Shinde(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे (Shivsena) आमदार नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांचं ट्विट आले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. शिवसेनेच्या गटनेते पदावरुनही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काढण्यात आले आहे. अजय चौधरी यांच्यावर गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे.

एकनाथ शिंदे सुरतला एका हॉटेलमध्ये आहेत, त्यात महाराष्ट्रातले दोन मंत्री, तसंच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे सगळे सहभागी आहेत. एका अपक्ष आमदाराचेही नाव समोर आलं आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचा मुलगा हे सगळे सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आंतराष्ट्रीय योगा दिनाच्या मुहूर्तावरच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा योग साधला गेला आहे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच बंडाचा झेंडा उगारला आहे. आता हे बंड कोणत्या दिशेने जाणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंच्या या संपुर्ण प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि काही आमदार यांच्याशी संपर्क होत नाहीये. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र भाजपला हे माहित असायला हवं की महाराष्ट्र राजस्थान आणि मध्यप्रदेश पेक्षा वेगळा आहे. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की कोणताही राजकीय भूकंप महाराष्ट्रात आलेला नाही येणारही नाही.

संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांना मी ओळखतो ते सच्चे शिवसैनिक आहेत. ते बिनशर्त परत येतील हा विश्वास मला वाटतो आहे. आमचे आमदारही शिवसैनिक आहेत. ते लवकरच परत येतील आणि सगळं काही सुरळीत होईल असा विश्वास मला वाटतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in