'आम्ही अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंना मदत केली असती की..', राऊतांचा खोचक टोला

'आम्ही अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंना मदत केली असती की..', राऊतांचा खोचक टोला
shiv sena leader sanjay raut taunt to mns raj thackeray over his ayodhya tour suspension decision

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा आज (20 मे) अचानक स्थगित केला आहे. राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मात्र राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. 'राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती.' असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना डिवचलं.

पाहा संजय राऊतांनी अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरेंना कसं डिवचलं:

'अयोध्येत इतर पक्षाचे काही कार्यक्रम होते. त्यांनी ते रद्द केले. त्यांना काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्कीच मदत केली असती. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनाला मानणारा वर्ग अयोध्येत आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांनी आणि इतरांनी शिवसेनेला नेहमीच सहकार्य केलं आहे. त्यांना आम्ही नक्कीच मदत केली असती.'

'राज ठाकरेंवर दौरा रद्द करण्याची नामुष्की आली असं काही मी म्हणणार नाही. काय अडचणी आहेत हे मला माहीत नाही. पण भाजपने मात्र, असं का करावं? पण ठिक आहे. यातून काही लोकांना शहाणपण आलं तर बरं होईल.'

'यातून नुकसान होतं हे काही लोकांना उशिरा समजतं. काही लोक तीर्थयात्रेला जातात. तेव्हा यात्रेत काही अडचणी येतात. तेव्हा लोक विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचा मदतकक्ष आहे यासाठी.'

'अयोध्या, वाराणासीत हा मदत कक्ष आहे. आम्ही धार्मिक लोकं आहोत. कुणाला काही याबाबत अडचण असेल तर आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही राजकारणाचा अभिनिवेश मागे ठेवतो.' अशा अत्यंत बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

अयोध्या दौरा स्थगित, राज ठाकरेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. पाहा त्यांचं नेमकं ट्विट काय.

'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित! महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच...

रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा.

स्थळ: गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे'

असं ट्विट करुन त्यांनी आपला दौरा स्थगित झाल्याची माहिती मनसैनिकांना दिली आहे.

shiv sena leader sanjay raut taunt to mns raj thackeray over his ayodhya tour suspension decision
राज ठाकरे सध्या कुठला इतिहास वाचत आहेत?

पुण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार?

राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार होते. पण राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संतांनी आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला होता. त्यातच यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेकडून या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली होती. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाण्याच्या तयारीत होते. असं असताना अचानक राज ठाकरेंनी दौराच स्थगित केल्याने मनसैनिक देखील बुचकळ्यात पडले आहेत. पण असं असलं तरीही राज ठाकरे या सगळ्याबाबत पुण्याचा आपल्या सभेत बोलणार आहेत. त्यामुळे ते दौरा स्थगित करण्याचं नेमकं कोणतं कारण देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in