
धनंजय साबळे
अकोला: अकोल्याच्या बाळापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (Shivsena) आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिली आहे. काल ते म्हणाले आहे मी अकोल्याला निघालो आहे पण रात्रीपासून संपर्क होऊ शकलेला नाही, मोबाईलही बंद आहे. त्यामुळे त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी त्याची नोंद घेतली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सगळे आमदार सुरतमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. संजय राऊत हे सांगत आहेत की काहीही भूकंप वगैरे येणार नाही.
एकनाथ शिंदे गुजरात पोहचले आहेत, त्यात महाराष्ट्रातले दोन मंत्री, तसंच एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे सगळे सहभागी आहेत. एका अपक्ष उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. समोर आलेल्या नावांमध्ये नितीन गायकवाड यांचे नाव दिसत नाहीये त्यामुळे नितीन गायकवाड एकनाथ शिंदेंसोबत आहेत की दुसऱ्या कोणत्या ठिकाणी हे अद्याप समजू शकलेले नाही.
एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत?
डॉ. तानाजी सावंत
बालाजी कल्याणकर
प्रकाश आबिटकर
अब्दुल सत्तार
संजय पांडुरंग शिरसाट
श्रीनिवास वनगा
महेश संभाजी शिंदे
संजय भास्कर रायमुलकर
विश्वनाथ भोईर
संदीपान भुमरे
शांताराम मोरे
रमेश बोरणारे
अनिल बाबर
चिमणराव पाटील
शंभूराज देसाई
सहाजी बापू पाटील
महेंद्र हरि दडवी
जयप्रदीप जैसवाल
महेंद्र सदाशिव थोरवे
किशोर पाटील
भारत गोगावले
ज्ञानराज चौगुले
बालाजी किडनीकर
सुहास कांदे
संजय गायकवाड
असे २६ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तसंच अपक्ष आमदार-चंद्रकांत पाटील हेदेखील त्यांच्यासोबत आहेत.