‘उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच, तेव्हा…’, योगींना सामनातून टोले अन् टोमणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘प्रश्न इतकाच आहे की, योगी महाराजांनी (Yogi adityanath) त्यांच्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईबरोबरच (Mumbai) बाजूच्या गुजरात राज्यातही जायला हवे व गुंतवणूकदारांना लखनौच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी गांधीनगरच्या (Gandhinagar) रस्त्यावर एखाद्या भव्य रोड शोचे (Road Show) आयोजन का करू नये?’, असं म्हणत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) योगी आदित्यनाथांवर टीकास्त्र डागलंय. (Shiv Sena UBT slams UP CM yogi adityanath)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात योगींनी गुंतवणूकदारांशी आणि बॉलिवूडमधील विविध घटकांशी संवाद साधला. योगींच्या या दौऱ्याचा राजकीय अर्थही लावले जात आहेत. शिवसेनेनं मुंबई दौऱ्यावरून सामना अग्रलेखातून सल्ला देतानाच टोलेही लगावले आहेत.

“मुंबईतील बड्या उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले व त्याबद्दल त्यांचं स्वागत केलं पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय? ताजमहल पॅलेस या कुलाब्यातील हॉटेलजवळ उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासासाठी योगी रोड शो करणार असल्याचं प्रसिद्ध झाले, पण प्रत्यक्षात हा रोड शो खरंच झाला काय?”, असा सवाल करत शिवसेनेनं हल्ला चढवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Yuvasena : प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना आदित्य ठाकरेंचा दणका

योगींचा मुंबई दौरा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. सामनात म्हटलंय की, “योगींचा मुंबईतील रोड शो हा भाजप पुरस्कृत राजकीय खेळ आहे. उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे.”

ADVERTISEMENT

“महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्यानं…”, सेनेचे योगींना खडेबोल

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नासेक लोकांची वरात डावोस येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेस निघाली आहे. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे बिऱ्हाड त्यांची वरात घेऊन निघालं आहे. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी डावोसच्या रस्त्यांवर रोड शो नक्कीच करणार नाहीत, हे मुंबईत रोड शो करणाऱ्या योगी महाराजांनी समजून घेतले पाहिजे. योगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत. महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्यानं वागून त्यांनी स्वतःची अप्रतिष्ठा करून घेऊ नये”, असं म्हणत शिवसेनेनं योगींना खडेबोल सुनावले आहेत.

ADVERTISEMENT

‘नंगानाच’ चालू देणार नाही : चित्रा वाघ यांनी उर्फीला ठणकावलं, चाकणकरांनाही भिडल्या!

शिवसेनेचा योगींना गुजरातमध्ये रोड शोचा सल्ला

“योगी महाराजांनी त्यांच्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईबरोबरच बाजूच्या गुजरात राज्यातही जायला हवं व गुंतवणूकदारांना लखनौच्या दिशेनं आकर्षित करण्यासाठी गांधीनगरच्या रस्त्यावर एखाद्या भव्य रोड शोचे आयोजन का करू नये?”, असा सवाल करत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) योगींबरोबर भाजपलाही डिवचलं.

“अतिथी देवो भव या नात्याने योगींचं स्वागत आहे, पण मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा. योगीजी हे भगव्या वस्त्रांतील सत्पुरुष आहेत, पण त्यांच्यात एक राजकारणीही दडला आहे. योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच आहे. तेव्हाही इंधन लागेलच”, असं म्हणत शिवसेनेनं योगींच्या मनातील महत्त्वकांक्षेला हात घातला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT