‘तर’ त्या खंडणीखोराला त्याच पद्धतीने उत्तर देऊ : महेश साठेंचे शरद कोळींना प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर : शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सध्या दसरा मेळावा हा वादाचा नवा अंक बनला आहे. सातत्याने दोन्ही गटांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याच आरोप-प्रत्यारोपामध्ये आता शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे विरुद्ध युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी अशा वादाला तोंड फुटले आहे. शिवसेना काय शिंदे गटाच्या बापाची नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बापाची आहे, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शरद कोळी यांनी केले होते.

कोळी यांच्या या वक्तव्याला आता महेश साठे यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. एखादा खंडणीखोर त्या पद्धतीने शिंदे साहेबांवर टीका करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. पक्षात कार्यकर्ते मिळत नाहीत म्हणून अशा लोकांची भरती सुरु आहे. अशांनी आम्हाला निष्ठा, पक्ष शिकवू नये असा सल्ला आणि इशारा महेश साठे कोळी यांना दिला. सोलापूर जिल्ह्यात सध्या शरद कोळी यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाच्या वतीने सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून महेश साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या पहिल्या दिवशी साठे यांनी कोळींवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते शरद कोळी?

शिवसेना काय शिंदे गटाच्या बापाची नाही. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या बापाची आहे. या बांडगुळानी शिवसेनेवर अधिकार गजवू नये. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतीर्थावर होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसल्याही परवानगीची गरज नाही. तसेच राज्यातील युवा सैनिकांना आणि शिवसैनिकांना मुंबईकडे कूच करण्याचा आवाहनही कोळी यांनी केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दसरा मेळाव्यावरुन अजित पवारांचा सुवर्णमध्य

दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुवर्णमध्य सुचविला आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रयत्न करावा. हायकोर्टमध्ये जाऊन पण परवानग्या घेतल्या गेल्या आहेत. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरतीच सभा घेत आहेत. बाळासाहेबांनीच उद्धव ठाकरे यांना सांभाळा असं आवाहन केलं होतं. शिंदे गटाला बीकेसीची जागा उपलब्ध करून दिली आहे, तर उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मिळावं, दोघांनी मेळावे घेतले तरी चालतील”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT