“उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला काय माहित?”; हिंगोलीत भास्कर जाधव कुणाला अस्वल म्हणाले?
हिंगोलीत इतके चांगले प्रतिनिधी असताना उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला, अशी टीका शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. भास्कर जाधव सोमवारी हिंगोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी प्रामुख्याने त्यांच्या निशाण्यावर हिंगोलीचे आमदार संतोष […]
ADVERTISEMENT

हिंगोलीत इतके चांगले प्रतिनिधी असताना उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला, अशी टीका शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. भास्कर जाधव सोमवारी हिंगोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी प्रामुख्याने त्यांच्या निशाण्यावर हिंगोलीचे आमदार संतोष बांगर होते.
शिंदे गटातील आमदारांनी बंड केल्यावर हिंगोलीचे आमदार यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. परत या म्हणत डोळ्यात अश्रू आणले होते. मात्र नंतर अविश्वास ठरावादरम्यान त्यांनी शिंदे गटाचा हात धरला आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात मतदान केलं. तेंव्हापासून ते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दरम्यान संतोष बांगर यांचा भास्कर जाधव यांनी त्यांच्या खास शैलीत आपल्या भाषणातून चांगलाच समाचार घेतला.
काय म्हणाले भास्कर जाधव?
“मला उद्धव ठाकरेंचं एक कळलं नाही, हिंगोलीत इतके चांगले शिवसैनिक असताना हे अस्वल कुठून निवडलं त्यांनी? भास्कर जाधवांनी असं म्हणताच सभास्थळी एकच हशा पिकला. पुढे बोलताना ते म्हणाले, हा गडी रडला, शाप दिला, शिवसेना सोडून जाणारांच्या पोरांना बायका मिळणार नाहीत म्हणला. बहुमत चाचणीच्या दिवशी त्यांच्या सोबत जाऊन बसला. मला वाटलं तो चुकून गेला असेल तर त्यांच्यातला एक आमदार म्हणला रात्री आम्ही त्याला दाखवला खोका तवा इकडे आला बोका”, असा किस्सा त्यांनी उपस्थितांना सांगितला.
हिंगोली जिल्ह्यात वाढत्या जुगार, मटका अवैध धंद्यावर देखील भास्कर जाधव यांनी लक्ष केंद्रित केलं. ते म्हणाले, मला येथील पोलिसांना विचारायच आहे की, सगळेजण जर भर सभेत आमदार बांगर मटका दारू जुगार चालवतात असा आरोप करत असतील तर याची दखल का घेतली जात नाही. मटका जुगार चालविणाऱ्यांवर कारवाई करा. नाहीतर मी विधानसभेत पोलिसांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पोलिसात जर खरी धमक असेल तर मटके चालविणाऱ्यांना तुरुंगात टाका, असं देखील भास्कर जाधव पोलिसांना म्हणाले.