"योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?" दीपाली सय्यद यांचा सवाल

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत दीपाली सय्यद यांनी?
"योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?" दीपाली सय्यद यांचा सवाल

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच एक ट्विट करून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. ऐ भोगी कुछ तो सिख हमारे योगीसे असं म्हणत त्यांनी टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न विचारत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

"योगी आणि भोगी यांच्यातला फरक कळतो का? योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं. देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार आहेत का?" असा प्रश्न दीपाली सय्यद यांनी विचारला आहे.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. हा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवरचे खासकरून मशिदींवरचे भोंगे योगी आदित्यनाथ सरकारने उतरवले आहेत. यानंतर ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगीसे असं म्हणत अमृता फडणवीस यांनी खोचक शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

"योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?" दीपाली सय्यद यांचा सवाल
"त्या कारमध्ये सोमय्या काय मोदी असते तरीही ती फोडली असती"

दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचंही केलं होतं समर्थन

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. सोमय्या काय त्या गाडीत जर मोदी असते तरीही ती गाडी शिवसैनिकांनी फोडली असती असं विधान सय्यद यांनी केलं आहे. त्या खोपोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

ज्यावेळेला ही घटना घडली तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर त्या कारमध्ये मोदी असते तरीही ती कार शिवसैनिकांनी फोडली असती. तुम्ही तिकडे गेलाच कशाला होता? असा सवाल सय्यद यांनी केला आहे.

खासदार नवनीत राणा यांना पोलीस कोठडीत हीन वागणूक दिली जात असल्याच्या गोष्टीवरही सय्यद यांनी भाष्य केलं. "न्यायालयीन कोठडीमध्ये तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलची ट्रिटमेंट मिळत नाही हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला कोठडीत नेल्यावर तुम्ही म्हणत असाल की मला फाईव्ह स्टारची थाळी द्या, गुलाबजाम द्या तर असं होणार नाही. जी वागणूक बाकीच्या लोकांना दिली जाते तिच तुम्हालाही दिली जाणार", असं म्हणत सय्यद यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला होता.

Related Stories

No stories found.