Deepali Sayed : "राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस..."

जाणून घ्या काय म्हटलं आहे दीपाली सय्यद यांनी त्यांच्या ट्विटमध्ये?
Deepali Sayed : "राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीस..."
Shivsena Leader Deepali Sayed says Raj Thackeray you please get well soon so that u can support devendra fadnavis

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या देवेंद्र फडणवीस असोत किंवा राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे त्यांना काळजी घेण्याचं आवाहन करत दीपाली सय्यद यांनी हे ट्विट केलं आहे.

राज्यातल्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरू असतानाच त्यांनी ही टीका केली आहे. विधान परिषदेसाठीची ही लढतही भाजपविरूद्ध महाविकास आघाडी अशीच आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Shivsena Leader Deepali Sayed says Raj Thackeray you please get well soon so that u can support devendra fadnavis
"योगी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस बायकोला सोडणार का?" दीपाली सय्यद यांचा सवाल

काय म्हणाल्या आहेत दीपाली सय्यद?

राजसाहेब तुम्ही लवकर बरे व्हा नाहीतर विधान परिषद निवडणुकीनंतर फडणवीससाहेब एकटे पडतील भोंगा अजून अर्धवट आहे. असं म्हणत खोचक ट्विट करत दीपाली सय्यद यांनी एकीकडे ऱाज ठाकरेंना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं असताना फडणवीसांवर टीका केली आहे.

राज ठाकरेंवर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार होती पण त्यांच्या शरीरात कोरोना डेड सेलमुळे त्यांना अॅनेस्थेशिया देता आला नाही. लीलावती रूग्णालयातल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. २० जूनला म्हणजेच आज काही वेळापूर्वी ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. दीपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंना लवकर बरं व्हा म्हटलं आहे पण फडणवीसांना टोला लगावला आहे.

Shivsena Leader Deepali Sayed says Raj Thackeray you please get well soon so that u can support devendra fadnavis
दीपाली सय्यद म्हणतात, 'स्वयंघोषित हिंदूजननायक' असं जाहीर करून ताम्रपट मिळत नाही

दीपाली सय्यद यांनी आधीही राज ठाकरेंवर केली होती टीका

अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव साहेबांची मेहरबानी राजसाहेबांनी विसरू नये , सहनशीलता ही निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदूजननायक करून ताम्रपट मिळत नाही." असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.

राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्याविरोधात भूमिका घेतल्यापासून दीपाली सय्यद या अनेकदा या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. सोशल मीडिया असो किंवा पत्रकारांनी विचारलेले प्रश्न असोत दीपाली सय्यद या कायमच भाजप आणि मनसेवर टीका करताना दिसल्या आहेत. आताही त्यांनी राज ठाकरेंना बरं होण्यासाठीच्या शुभेच्छा देताना त्यांच्यावर फडणवीसांना टोला लगावला आहे. आता यावर भाजपकडून किंवा मनसेकडून काही उत्तर दिलं जाणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in