आमदारांचे वाद सोडविताना CM शिंदेंची दमछाक : चिमणराव पाटलांची गुलाबराव पाटलांविरुद्ध तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जळगाव : अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू-रवी राणा यांच्यातील वाद सुरु असतानाच आता जळगावचे आमदार चिमणराव पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आमदारांचे वाद सोडविताना शिंदे यांची दमछाक होत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील या जिल्ह्यातील दोन नेत्यांमधील संघर्ष नवीन नाही. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या तालुक्यात पाणी पुरवठा योजनेच्या कामांना मंजुरी दिल्यावरुन आमदार चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील पुन्हा आमने-सामने आले आहेत.

चिमणराव पाटील काय म्हणाले?

याबाबत बोलताना चिमणराव पाटील म्हणाले, याची तक्रार शिंदे साहेबांच्या कानावर केली आहे. हा राजकारणातील थोडासा क्षुद्रपणा आहे. एका सरकारमध्ये काम करताना आणि ते सरकार बनविण्यामध्ये एका एका मताचा वाटा असतो. एका एका मतावर सरकार येत आणि सरकार कोसळतं, हे अटलबिहारी वाजपेयींच्या काळात आपण बघितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यामुळे सरकार हे कोणी मंत्री झाला म्हणून त्याची खाजगी मालमत्ता होत नाही. सर्वांच मिळून सरकार आलेलं असतं, आणि सरकार असतं म्हणून तुम्ही मंत्री असता. माझ्यावर अन्याय झाला, हे मी एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातलं आहे, आणि त्यांनी फोन करुन असं पुन्हा होऊ नये असंही सांगितलं असल्याचं म्हटलं आहे.

गुलाबराव पाटील यांचं प्रत्यूत्तर :

तर चिमणराव पाटील यांच्या नाराजीवर विचारले असता गुलाबराव पाटील यांनी, ही पाणी पुरवठ्याची योजना असून त्यासाठी माझ्याकडे कम्युनिष्ट पक्षाचा जरी माणूस आला तरी ती योजना मंजूर करणार, असं म्हणतं चिमणराव पाटील यांना डिवचले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT