Sanjay Raut : प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, शिवसेनेसाठी! बाळासाहेबांना अभिवादन!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या दहाव्या स्मृतीदिनी केलेलं ट्विट चर्चेत
Shivsena MP Sanjay Raut Tweet On Balasaheb Thackeray 10th Death Anniversary
Shivsena MP Sanjay Raut Tweet On Balasaheb Thackeray 10th Death Anniversary

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. साहेब प्रत्येक श्वास तुमच्याचसाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी असं म्हणत संजय राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. संजय राऊत यांचं हे ट्विट चर्चेत आहे.

मध्यंतरीच्या काळात संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर १०० दिवसांपेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मिळाला. त्यांची दिवाळीही तुरुंगात गेली. उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊत यांचा उल्लेख मुलुखमैदान तोफ असा केला होता. महाविकास आघाडी सरकार आणण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनी संजय राऊत यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी दुसरंही ट्विट केलं आहे.

संजय राऊत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबतचा जुना फोटो पोस्ट केला आहे. हे नातं खूप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है साहेब विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र असं संजय राऊत यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना केलं आहे अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना शतशः नमन! तुमच्या स्मृतिदिनी माझं तुम्हाला वचन, प्रत्येक श्वास देशासाठी, महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी!

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असं सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांना जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवायची होती तेव्हा त्यांच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती. आज बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने ट्विटरवर त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. विविध नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in