"चार गाढवं चरत असली तरीही हुकूमशहाला भीती वाटते..." शिवसेनेची मोदींवर टीका

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे
Shivsena Slams Government bjp and modi government about parliament and non parliamentary words
Shivsena Slams Government bjp and modi government about parliament and non parliamentary words india Today

संसदेत असंसदीय शब्दांचा वापर करण्यास निर्बंध येणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी एक यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. धरणे, निदर्शनं, उपोषण, आंदोलन या सगळ्याला बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणारवरून सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Shivsena Slams Government bjp and modi government about parliament and non parliamentary words
द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा आहे, योग्य व्यक्तीचे समर्थन केले- संजय राऊत

हुकूमशहा हा डरपोक माणूस असतो, चार गाढवं चरत असली तरीही त्याला भीती वाटते की आपल्या विरोधात काहीतरी कट सुरू आहे. आजचं चित्र काही वेगळं दिसत नाही असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

भारतीय संसद अधिक सभ्य आमि सुसंस्कृत करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. सरकारने असंसदीय शब्दांची नवी यादी जाहीर केली आहे. जयचंद, शकुनी, जुमलाजिवी, दलाल, सांड, भ्रष्ट, असत्य, अपमान, तानाशाह, विनाश पुरूष, कालाबाजारी असे मजू शब्दभांडार संसदेत उधळण्यावर त्यामुळे निर्बंध येणार आहेत. सत्ताधारी बाकांवरचे सदस्य गेल्या काही वर्षांपासून शिस्तीचे अजीर्ण झाल्याप्रमाणेच वागत आहेत. पण विरोधी बाकांवरील सदस्यांनीही या अमोघ शब्दअस्त्रांचा वापर करू नये यासाठी हा सगळा डाव रचला गेला आहे.

या नवीन ‘असंसदीय’ शब्दांच्या यादीवरून वादंग निर्माण झाल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यावर खुलासा केला आहे. संसद सचिवालयाकडून कोणत्याही शब्दांवर बंदी आणलेली नसून प्रत्येक संसद सदस्य आपले मत मांडण्यासाठी मुक्त आहे. मात्र लोकसभा सचिवालयाने सूचिबद्ध केलेले ‘असंसदीय’ शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील, असे लोकसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे शब्द वापरावर बंदी नसली तरी ते कामकाजातून काढून टाकले जाऊ शकतील. थोडक्यात, संसद सदस्यांचा बोलण्याचा अधिकार मान्य करायचा, पण त्याच वेळी त्याने कोणते शब्द वापरायचे नाहीत, याचाही अप्रत्यक्ष आदेश द्यायचा, असा हा प्रकार म्हणावा लागेल.

Shivsena Slams Government bjp and modi government about parliament and non parliamentary words
Sanjay Raut : महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही

ज्या शब्दांना लोकसभा सचिवालयाने ‘असंसदीय’ वगैरे ठरविले आहे ते शब्द आपल्या संसदीय संघर्षाचे वैभव आहे. त्यात असंसदीय असे काय आहे? भ्रष्टाचाराला भ्रष्टाचार म्हणायचे नाही. मग पर्यायी शब्द काय आहे? तानाशाह म्हणजे हुकूमशहाला काय दुसरी उपमा द्यायची? महाराष्ट्रात गद्दारीचा प्रयोग घडवून दिल्लीने लोकशाहीचा गळा घोटलाच आहे. या तानाशाहीवर संसदेत आवाज उठवताना आता सदस्यांनी काय व कसे मत व्यक्त करायचे? विरोधकांच्या जिभाच कापून त्या घटनेच्या, स्वातंत्र्याच्या चितेवर ठेवल्या आहेत. संसदेत विरोधकांनी सभ्य, सुसंस्कृत भाषेचा वापर करायचा. पण संसदेच्या बाहेर सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी शब्दांचे असंसदीय फवारे उडवायचे हे चालेल काय? मग संसदेतील हाच ‘तानाशाही’ नियम बाहेरही लावा व देशाच्या जिभेची टाळेबंदी केली असे एकदाचे जाहीर करा. हे तर आणीबाणीपेक्षा भयंकर आहे.

जो पक्ष ‘‘आम्ही आणीबाणी आणि हुकूमशाहीविरुद्ध लढा दिला’’ असे उठताबसता बोलत असतो त्यांनीच लोकशाही, स्वातंत्र्य व संसदीय कार्यावर असा घाव घालावा? भाजप प्रतिवर्षी आणीबाणीचे श्राद्ध घालण्याचा राजकीय सोहळा साजरा करतो. त्या सोहळय़ाच्या बरोबरीने आता संसदेच्या सध्याच्या अवस्थेचेही तेरावे घालून मोकळे व्हा, अशी चीड जनतेतून प्रकट होताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in