'सन्मानाने बोलवलं तर..' म्हणणाऱ्या आमदारांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी धुडकावला

दीपक केसरकर यांनी सन्मानाने बोलवलं तर जाऊ असं म्हटलं होतं त्यावर उद्धव ठाकरे यांनी खणखणीत उत्तर दिलं आहे
Shivsena uddhav thackray on eknath shinde camp rebel mla deepak kesarkar matoshree
Shivsena uddhav thackray on eknath shinde camp rebel mla deepak kesarkar matoshree

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला जर सन्मानाने बोलावलं तर मातोश्रीवर नक्की जाऊ असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. इतकंच नाही तर आता आम्हाला बोलवताना भाजपशी चर्चा करावी असंही शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी म्हटलं होतं. या सगळ्यानंतर आता यावर उद्धव ठाकरेंनी या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे.

Shivsena uddhav thackray on eknath shinde camp rebel mla deepak kesarkar matoshree
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या मातोश्रीमध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सुरू करताच पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले की मी आज तुम्हाला सन्मानाने बोलवलं आहे आणि तुम्ही आलात त्याबाबत तुमचे धन्यवाद असं म्हणत पहिला टोला आमदारांना तिथेच लगावला. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिकडे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीवर सन्मानाने बोलवलं आणि भाजपशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना म्हटलंय, सुरत जाऊन बोलण्यापेक्षा इथेच चेहरा दाखवून बोलला असतात तर जास्त बरं झालं असतं. इतकं सगळं पर्यटन करायची वेळ आली नसती, गरज पडली नसती.

मला एका गोष्टीचं समाधान वाटतं आहे की जे लोक सोडून गेले त्यांना आजही मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य या सगळ्यांबाबत प्रेम वाटतं आहे. मी त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो. आजही तिकडे जाऊनही त्यांचं आमच्याबद्दलचं प्रेम पाहून मी धन्य झालो. मात्र हेच प्रेम गेल्या अडीच वर्षात जे लोकं आपल्या पक्षावर, माझ्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत बोलत होते तेव्हा कुठे गेलं होतं? तेव्हा कुणी काहीच का बोललं नाही?भाजपने मागच्या अडीच वर्षात माझ्यावर माझ्या कुटुंबावर विकृत भाषेत टीका केली. मी विकृत हाच शब्द वापरतो आहे कारण त्यापेक्षा कुठला वाईट शब्द आत्ता मला आठवत नाहीये. तेव्हा माझ्यावर, शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या एकाचीही दातखिळ उचकटली नव्हती. आत्ता जे मला भाजपसोबत जाऊया सांगत आहेत त्यांच्यापैकी कुणीही तेव्हा विरोध दर्शवला नव्हता.

Shivsena uddhav thackray on eknath shinde camp rebel mla deepak kesarkar matoshree
आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात पक्षातली नाराजी आली समोर

ज्या लोकांनी ठाकरे कुटुंबाचा अपमान केला, माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला अशा लोकांसोबत तुम्ही आता मांडीला मांडी लावून बसला आहात? त्यांना मिठ्या मारत आहात. मग हे तुमचं माझ्यावरचं प्रेम खरं आहे की तकलादू? जनतेला ते कळू द्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरे यांनी परत बोलावलं तर शिंदे गटाची काय भूमिका असेल असा प्रश्न दीपक केसरकर यांना विचारण्यात आला होता त्यावर दीपक केसरकर म्हणाले होते की, "आम्ही आता भाजपसोबत आलो आहोत. एक नवं कुटुंब तयार झालं आहे. या कुटुंबातून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलवताना उद्धव ठाकरे यांना भाजपशी चर्चा करावी लागेल. आशीर्वाद द्यावा लागेल, सन्मानाने बोलवावं लागेल." या बाबतच उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत शिंदे गटाचा हा प्रस्ताव धुडकावला आहे. तसंच शिवसेनेचा धनुष्यबाण हा शिवसेनेकडेच राहिल इतर कुणाकडेही तो जाण्याचा प्रश्न येत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in