'कोणी योगी, कोणी भोगी.. तर कुणी मानसिक रोगी', आव्हाडांचं अमृता फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर

Jitendra Awhad Vs Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना तात्काळ तशाच स्वरुपात प्रत्युत्तर दिलं आहे.
'कोणी योगी, कोणी भोगी.. तर कुणी मानसिक रोगी', आव्हाडांचं अमृता फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर
some are mentally ill jitendra awhad reply to amruta fadnavis on twitter

मुंबई: उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्यांच्या राज्यातील 11 हजार भोंगे हटवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगींचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्याचवेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक अत्यंत खोचक ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.

'ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगी से...', असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. आता त्यांच्या याच ट्विटनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अमृता फडणवीसांना त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली होती तशाच स्वरुपात प्रत्युत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर

'कोणी योगी आहे

कोणी भोगी आहे

तर कुणी मानसिक रोगी आहे.'

असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. याच ट्विटसोबत त्यांनी एक GIF इमेज देखील शेअर केली आहे.

2019 साली राज्यातील फडणवीस सरकार गेल्यापासून अमृता फडणवीस या सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे. अशीच टीका काल (28 एप्रिल) देखील त्यांनी केली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, 'ऐ भोगी कुछ तो सीख हमारे योगीसे' अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली होती.

अमृता फडणवीस यांनी 24 एप्रिललाही ठाकरे सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्या परिस्थितीवरून हे दोन ट्विट केले आहेत. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही भाजपची टॅगलाईन होती. त्याच टॅगलाईनवर आधारित टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.

मशिदींच्या भोंग्याचं नेमकं प्रकरण काय?

'मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात राज्य सरकारला 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. हा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवरचे खासकरून मशिदींवरचे भोंगे योगी आदित्यनाथ सरकारने उतरवले आहेत.

some are mentally ill jitendra awhad reply to amruta fadnavis on twitter
"ऐ 'भोगी' कुछ तो सीख हमारे 'योगी'से" अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

ज्यानंतर राज ठाकरे यांनी योगी सरकारचं कौतुक करताना असं म्हटलं होतं की, 'उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरचे, विशेषतः मशिदींवरचे भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचं मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्या महाराष्ट्रात योगी कुणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे भोगी महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.' असं ट्विट राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं होतं.

Related Stories

No stories found.