अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला नवीन ऑफर, जयंत पाटलांनी काय सांगितलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar group meet sharad pawat yb center jayant patil told the reason behind meeting
ajit pawar group meet sharad pawat yb center jayant patil told the reason behind meeting
social share
google news

राष्ट्रवादीतील बंडखोरी नंतर आज दुसऱ्यांदा अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार (Sharad pawar)यांची भेट घेतली. अजित पवार गट अचानक वाय.बी.सेंटरमध्ये दाखल होऊन त्यांनी ही भेट घेतली होती.साधारण अर्धातास ही भेट झाली आहे. या भेटीत अजित पवार गटाने आता शरद पवार गटाला नवीन ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. या नवीन ऑफर बाबतची माहिती आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. (ajit pawar group meet sharad pawat yb center jayant patil told the reason behind meeting)

ADVERTISEMENT

अजित पवार गटाच्या या भेटीनंतर शरद पवार गटाकडून बैठकीला उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या भेटीमागचं कारण सांगितले आहे. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीबाबत अजित पवार गटातील मंत्र्यांनी आज शरद पवारांसमोर दिलगिरी व्यक्त केली.याचसोबत अजित पवार गटाला असलेला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा लक्षात घेऊन राष्ट्रवादी एकसंघ करावी,अशी मागणी अजित पवार गटाने शरद पवार गटाकडे केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.अजित पवार गटाने शरद पवारांना दिलेल्या या प्रस्तावावर अद्याप काहीच निर्णय़ घेतला नाही आहे. तसेच या प्रश्नावर उत्तर द्याव की नाही द्याव हा त्यांचा प्रश्न आहे, असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र

प्रफुल पटेल काय म्हणाले?

दरम्यान आज अजित पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल पटेल यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी शरद पवार आमचे दैवत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करावा. यावर काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आम्ही शरद पवार यांना केल्याचे प्रफुल पटेल म्हणाले आहेत. दरम्यान आता अजित पवार यांनी दिलेल्या या नवीन ऑफरवर आता शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra CM : फडणवीसांना पहिली पसंती! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना ठरले भारी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT