NCP: ‘ती’ तक्रार अन्…अजित पवार गटाची उद्याची बैठक होणार की नाही?
. राजकीय फायद्यासाठी एम.इ.टी. संस्थेचा गैरवापर होत असल्याचा आरोप शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त सुनील कर्वे यांनी केला आहे. यासोबत कर्वे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर मुंबई एम.इ.टीने देखील एक पत्रक जारी केली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांनी उद्या 5 जुलै 2023 रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 1 वाजता, तर अजित पवार यांची वांद्रे येथील एम.इ.टी. कॉलेमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीपुर्वीच अजित पवारांच्या बैठकीला विरोध होऊ लागला आहे. राजकीय फायद्यासाठी एम.इ.टी. संस्थेचा गैरवापर होत असल्याचा आरोप शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त सुनील कर्वे यांनी केला आहे. यासोबत कर्वे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर मुंबई एम.इ.टीने देखील एक पत्रक जारी केली आहे. या पत्रकातून अजित पवारांच्या उद्याच्या बैठकीला परवानगी दिल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे एकीकडे विरोध आणि दुसरीकडे मुभा अशी परीस्थिती निर्माण झाली असून अजित पवार यांची उद्याची बैठक होणार की नाही असा पेच निर्माण झाला आहे. (ajit pawar group will have a meeting tomorrow or not bandra met college maharashtra politics)
ADVERTISEMENT
अजित पवार यांनी उद्या एम.इ.टी कॉलेजमध्ये आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवारांनी बोलावलेल्या उद्याच्या पक्षाच्या बैठकीला एम.इ.टी. शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त सुनील कर्वे यांनी विरोध दर्शवला आहे. राजकीय फायद्यासाठी एम.इ.टी संस्थेचा गैरवापर करण्यात आला. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी या संस्थेचा भ्रष्टाचार करण्यासाठी वापर केला. याच संस्थेत कंत्राटदार पैशांच्या बॅगा घेऊन याचचे, असा गंभीर आरोप सुनील कर्वे यांनी केला आहे. हा आरोप करत सुनीव कर्वे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करत बैठकीला विरोध दर्शवला आहे.
हे वाचलं का?
एम.इ.टीचे स्पष्टीकरण
दरम्यान या प्रकरणात एम.इ.टीने आता एक पत्रक जारी केली आहे. या पत्रकातून त्यांनी उद्याच्या अजित पवार यांच्या बैठकीबाबत मोठी माहिती दिली आहे. आम्ही आमच्या संस्थेची जागा ही खाजगी कार्यक्रमासाठी देत असतो आणि रितसर भाडेही घेत असतो. उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विचारणा केली होती. त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून रीतसर भाडे घेऊन परवानगी दिल्याचे एम.इ.टीने म्हटले आहे. याचसोबत या बैठकीसाठी मुंबई महापालिकेची देखील परवानगी आम्ही घेतली आहे. तसेच ज्या ज्या यंत्रणांची परवानगी आवश्यक असते त्याची परवानगी संस्थेने घेतली आहे.
तसेच ज्या व्यक्तीची (सुनील कर्वे) मुलाखत आपण घेतली आहे, तो व्यक्ती आमच्या संस्थेत कोणत्याही अधिकृत पदावर नाही. तो व्यक्ती संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे देखील एम.इ.टीने म्हटले आहे. आमची संस्था ही महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था आहे, याला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे देखील एम.इ.टीने सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT