Praful Patel: काल मंत्री, आज आमदार… शरद पवारांनी नेमकं काय केलं?, पटेलांनी खरं ते सांगूनच टाकलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar met sharad pawar along with supporting mla praful patel given exact information about sharad pawar accepted mlas proposal or not latest political news
ajit pawar met sharad pawar along with supporting mla praful patel given exact information about sharad pawar accepted mlas proposal or not latest political news
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) विरोधात जात थेट भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण असं असलं तरीही शरद पवार यांचं महाराष्ट्रातील जनतेवर असणारं गारूड आणि त्यांची मतदारांच्या काळजाला हात घालण्याची हातोटी ही वादातीत आहे. त्यामुळे आपण शरद पवार यांच्या विरोधात जाऊन काहीही भूमिका घेतली तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात अशी भीती आता अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना (MLA) वाटत आहे. या सगळ्यातच काल अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज लागलीच आपल्या पाठिराख्या आमदारांना घेऊन अजित पवार हे थेट वाय. बी. चव्हाण सेंटरवर पोहचले. पण यावेळी शरद पवार आमदारांसोबत नेमकं काय म्हणाले याबाबत प्रफुल पटेल यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. (ajit pawar met sharad pawar along with supporting mla praful patel given exact information about sharad pawar accepted mlas proposal or not latest political news maharashtra)

ADVERTISEMENT

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या भेटीनंतर प्रफुल पटेल काय म्हणाले?

‘आज अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी आज चव्हाण सेंटर आले होते. आम्ही देखील त्यांच्यासोबत आलो. काल अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी इथे आलो होतो.’

हे ही वाचा >> Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?

‘काल रविवार असल्यामुळे आमदार आपआपल्या मतदारसंघात होते. विधीमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यामुळे बरेच आमदार हे मुंबईत हजर होते. त्यामुळे फक्त मंत्र्यांनीच नव्हे तर ज्येष्ठ नेत्यांनीच नव्हे बाकीच्याही आमदारांना शरद पवार साहेबांचा आशीर्वाद मागण्याची संधी मिळवून देण्याच्या निमित्ताने आज आम्ही माहिती काढली की, पवार साहेब चव्हाण सेंटरला येणार आहेत. म्हणून आम्ही इथे आज आलो.. सर्व आमदारांनी साहेबांचे आशीर्वाद घेतला.’

हे वाचलं का?

‘काल जसं मी म्हटलं होतं की, तशीच विनंती आज करून आम्ही पक्ष एकसंध राहावा त्या दिशेने पवार साहेबांनी विचार करावा अशीच विनंती करून आम्ही इथून आता निघणार आहोत.’ अशी माहिती प्रफुल पटेल यांनी यावेळी दिली.

‘आमदारांचं बोलणं ऐकून घेतलं, पण पवार साहेबांनी…’

‘काल मी सांगितलं होतं की, आमचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. तसं आजही त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतर जे काही असेल त्याबाबत मी आज कसं बोलू शकतो की, त्यांच्या मनात काय आहे?’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘महिनाभर थांबा, तुम्ही पण भाजपत येणार’, विधानसभेत गिरीश महाजनांचा नवा बॉम्ब

‘आम्ही पवारसाहेबांना विनंती केली.. त्यांनी आमचं म्हणणं आजही ऐकून घेतलं जसं त्यांनी काल ऐकून घेतलं. आज देखील त्यांनी आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते पुढे काही बोलले नाही. पण चांगल्या पद्धतीने त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं.’ असंही प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT