राष्ट्रवादी फुटली! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, 9 घेणार शपथ
राजभवनावर दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेतेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
ADVERTISEMENT
Earthquake in Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथ विधी सोहळा दुपारी अडीच वाजता सुरू झाला. सुरुवातीला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. (Ajit Pawar Takes oath as deputy chief minister of Maharashtra)
ADVERTISEMENT
अजित पवारांनी दिला विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
राजभवनावर दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर शपथविधी सोहळा सुरू झाला. यावेळी राज्यपाल बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली, तर इतर नेत्यांना मंत्रीपदाची शपथ दिली.
शरद पवारांच्या जवळचे नेते शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री
अजित पवार, उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ, मंत्री
दिलीप वळसे-पटेल, मंत्री
हसन मुश्रीफ, मंत्री
धनंजय मुंडे, मंत्री
धर्मरावबाबा आत्राम, मंत्री
आदिती तटकरे, मंत्री
संजय बनसोडे, मंत्री
अनिल पाटील, मंत्री
हे वाचलं का?
Ajit Pawar and other NCP MLAs have come here. An Oath ceremony will be held here, says Maharashtra BJP president Chandrashekhar Bawankule pic.twitter.com/Tn2XEOuXDW
— ANI (@ANI) July 2, 2023
शपथ विधी बघण्यासाठी येथे व्हिडीओवर क्लिक करा
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षात तिसऱ्यांदा भूकंप
राज्यात अशा स्वरुपाचा राजकीय भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत पहाटे शपथ घेतली होती. त्यानंतर बहुमत सिद्ध न करता आल्याने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
ADVERTISEMENT
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले होते. हे सरकार कार्यरत असतानाच शिवसेनेत बंड झालं आणि महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी 2022 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेला वर्ष पूर्ण होत नाही, तोच आता अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत भूकंप घडवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT