Anil Deshmukh : फडणवीसांना देशमुखांचे थेट चॅलेंज, ''माझ्याविरोधातील व्हिडिओ क्लिप्स जगजाहीर कराव्या''
Anil Deshmukh News : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे.
अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही.
माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत.
Anil Deshmukh Challenge Devendra Fadnavis : राज्यातील चार बड्या नेत्यांना तुरूंगात डांबण्याचा डाव होता, असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) यांनी केल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. यामध्ये देवेंद्र फडवणीस यांनी देशमुख यांना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर ता देशमुख यांनीही फडणवीसांना प्रतिआव्हान दिले आहे. (anil deshmukh give open challenge to devendra fadnavis over allegation of shyam manav maharashtra politics)
अनिल देशमुख माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, अनिल देशमुख पुराव्याशिवाय बोलत नाही. कशा पद्धतीने माझ्यावर दबाव टाकला. आमच्या नेत्यांवर आरोप करण्यात सांगितले. याचे सर्व पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव होता, यात माझाकडे एक पेन ड्राईव्ह आहे. त्यात पुरावे आहेत," असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Shyam Manav : फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे श्याम मानव कोण?
"देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की माझ्याकडेही व्हिडिओ क्लीप आहेत. त्यामध्ये मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत काही बोललो. माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे त्यांनी ते व्हिडीओ क्लिप जाहीर कराव्यात. वेळ आल्यावर मी हे पुरावे दाखवेल," असा दावा अनिल देशमुख यांनी करत देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहेत.
ऑडिओ क्लिप सार्वजनिक करेन
'मला त्यांनाही (अनिल देशमुख) सांगणं आहे की, त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्या काळातील त्यांचे काही ऑडिओ-व्हिझ्युअल मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंना काय बोलतायेत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायेत.. जे आरोप ते आता आमच्यावर जे बोलतायेत ते तेव्हा काय बोलत होते, वाझेवर ते काय बोलतायेत.. या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. माझ्यावर वेळ आली तर त्या मला सार्वजनिक कराव्या लागतील.'
हे वाचलं का?
'मी अशाप्रकारचं राजकारण करत नाही. पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल. तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की, देवेंद्र फडणवीस कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
हे ही वाचा : Mahabaleshwar: महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन् तुम्हीच काय ते ठरवा!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT