Ashok Chavan : ''मला संपवू नका! मी राहिलो नाही, तर तुम्हीही राहणार नाही'', अशोक चव्हाण 'हे' काय बोलून गेले?
Ashok Chavan Big statement : ''मला राजकारणातुन संपवू नका, मला जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार. मी संपलो की सगळं संपलं, असं मोठं विधान अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाणांच्या या विधानाची एकच चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार
मी संपलो की सगळं संपलं
अशोक चव्हाणांचं मोठं विधान
Ashok Chavan Big statement : कुवरचंद मंडले, नांदेड : भोकर मतदार संघात सुरु असलेला विरोध माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना चांगलाच जिव्हारी लागल्याच दिसून येतं आहे. या विरोधाला समोर जात असताना माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मोठं विधान केले आहे. ''मला राजकारणातुन संपवू नका, मला जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार. मी संपलो की सगळं संपलं, असं मोठं विधान अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाणांच्या या विधानाची एकच चर्चा रंगली आहे. (ashok chavan big statement on bhokas matdar sangh maharashtra politics)
अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे आयोजित एका भूमिपूजन कार्यक्रमात अशोक चव्हाण बोलत होते. ''आम्ही विरोधकांना घेऊन एकत्र घेऊन बसतो, आमचं धुऱ्याच भांडण नाही, पण तुमचं भांडण माझ्या वडिलांशी असेल तर, माझ्याशी असणे कारण नाही आणि माझ्याशी असेल तर माझ्या मुलीशी असणे कारण नाही. गावात येऊ नका बोलू देऊ नका असा प्रकार चुकीच आहे, तुम्हाला माझा चेहरा पसंद नसेल तर काही हरकत नाही, पण मला राजकारणातुन संपवू नका, मी राहिलो नाही तर तुम्ही कोणाला सांगणार, तुम्ही साथ द्या'' अशी भावनिक अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघातील जनतेला घातली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Harshvardhan Patil: शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतली तुतारी!
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ''माझं नाव घेतल्या शिवाय काही मंडळींना करमत नाही, 24 तास माझ्यावर टिका केली जातं आहे. एक वेळेस टीव्ही बंद होईल पण माझ्यावर टिका करणे सोडत नाहीये. राजकीय क्षेत्रात मला जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार. मी संपलो की सगळं संपलं. तुम्ही नंतर कोणाला बोलणार असं चव्हाण म्हणाले आहेत.
विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलायचं आहे. तुम्ही सांगा आम्ही तिथे हजर राहू, पण विरोध करू नका. भांडण वीस तीस वर्ष चालावी असं नाही. पूर्वी मला जो पक्ष विरोध करत होता, त्याच भाजप पक्षात आता आलो आहे. शेलगावच्या जनतेने मला साथ दिली आहे. विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत राहणार असं देखील चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
'त्या' विधानावर चव्हाणांचे स्पष्टीकरण
''जे राजकीय विरोधक आहेत जे सातत्याने माझ्यावर व्यक्तिगत विरोध करत असतात त्यांच्याबाबतीत मी बोललेलो आहे. माझ्या बोलण्याचा हेतू ऐवढाच होता की त्यांचं जे काही अस्तित्व आहे ते माझ्यामुळेच आहे. माझ्याबद्दल बोलत असतात म्हणून त्याना महत्व आहे. मी त्यानं म्हणालो मीच अस्तित्वात राहिलो नाही तर तुमचंही अस्तित्व राहणार नाही माझं अस्तित्व टिकवलं तर तुमचं अस्तित्व टिकेल असं मला विरोधकांना सांगायचं आहे.मी राजकीय विरोधकांबद्दल बोललो आहे कुठलाही व्यक्तिगत बोललो नाही, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले आहे.
हे ही वाचा : Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?
''तुम्ही माझे विरोधक हेच तुमचं कॉलीफीकेशन आहे. मी आहे तोपर्यंत तुम्ही राहाल ज्या दिवशी मी राहिलो नाही त्यादिवशी तुमचंही अस्तित्व राहणार नाही. माझ्यावर टिका करण हेच भांडवल आहे त्यामुळे माझं अस्तित्व टिकाव आणी तुमचंही टिकाव. माझ्याबरोबर राहून काही मोठे झाले तर काही माझ्यावर टिका करून मोठे झाले. दरम्यान निवडणुकामध्ये शिमगा असतो.मनामधली मळमळ असते दुर्दैवीने राजकारणातील पातळी खाली गेली आहे की धोरणावर ,पक्षावर ,कामावर बोलण्या ऐवजी व्यक्तिगत टीका टिपण्णी करण्यामध्येच लोंकाना स्वारस्य आहे. परंतु मतदारांना यामध्ये बिल्कुल स्वारस्य नाही. मतदार सुज्ञ आहे काम कोण करतोय? आमचा विकास कोणी केलाय? आणि कोणामध्ये क्षमता आहे? याच्यावर इलेक्शन होतं परंतु विरोधकांनां अजुनही वाटतं की व्यक्तिगत टिका होतेय.श्रीजया ही एक नविन सुरवात आहे. पण कोन काय बोलत याला मी महत्व देत नाही'', अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT