बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण, माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक; गाड्याही फोडल्या; मोठा राडा

मुंबई तक

Beed Nagarpalika Election : बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण, माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक झालीये. आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव विदोजित पंडित आमने-सामने आलेले पाहायला मिळाले.

ADVERTISEMENT

Beep Nagarpalika Election
Beep Nagarpalika Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये मतदानाला हिंसक वळण

point

माजी आमदाराच्या घरासमोर दगडफेक; गाड्याही फोडल्या; मोठा राडा

Beed Nagarpalika Election  : नगरपरिषद निवडणुकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेला मंगळवारी अचानक हिंसक वळण लागले. गेवराई तालुक्यात पंडित गट आणि पवार गट यांच्या मोठा तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती इतकी बिघडली की माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आणि काही वेळातच परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेदरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव विदोजित पंडित हेही आमने-सामने आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. या वादातून दोन्ही गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र काही काळ पाहायला मिळाले.

हेही वाचा : संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले, मतदान केंद्रावर फोनवर गप्पा, बटण दाबण्यास सांगितलं अन् घोषणाबाजी VIDEO

घटनास्थळी तणाव वाढत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मोठ्या संख्येने पथक तैनात केले. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठी हानी टळली असली तरी सकाळपासूनच परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. मतदानावर या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp