”उद्धव ठाकरेंना राजकीय लव्ह जिहाद झालाय”,नितेश राणेंची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp nitesh rane criticize uddhav thackeray
bjp nitesh rane criticize uddhav thackeray
social share
google news

Nitesh Rane Criticize Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचं धर्मांतर झालंय, त्यांना राजकीय लव जिहाद झालाय. 2019ला नुसता मुख्यमंत्री करून घेतला नाही, तर सुंता करून टाकलं आणि धर्मांतर केलयं अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (bjp nitesh rane criticize uddhav thackeray has become a political love jihad)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात यांना पाकिस्तानचा अजेंडा चालवायचाय, शरीया कायदा लागू करायचाय, म्हणूनच यांना काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरी सारखे चित्रपट नकोत, अशी टीका नितेश राणे यांनी ठाकरेंवर केली होती. काही वर्षापुर्वी याच शिवसेनेने शाहरूख खानच्या माय नेम इज खान चित्रपटाचा विरोध केला होता, आता तेच काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरी या चित्रपटांना विरोध करताय, अशी आठवण नितेश राणे यांनी यावेळी करून दिली.

हे ही वाचा : ‘शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव’,ठाकरे गटाची भाजपवर टीका

नितेश राणे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेसोबत या सगळ्यांच धर्मांतर झालंय, राजकीय लव जिहाद झालाय. 2019 ला नुसता मुख्यमंत्री करून घेतला नाही, तर सुंता केली आणि याचा लव जिहाद करून टाकलाय, धर्मांतर केलयं,म्हणूनच पाकिस्तानची आणि जिहांदींची भाषा उद्धव ठाकरेंची टोळी करताय, अशी टीका नितेश राणेंनी केली.

हे वाचलं का?

बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ दाखवला

नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांनी कॉग्रेसबाबत अपशब्द वापरले होते.
कॉग्रेस पक्षात एवढे हिं***** आहेत, हि***** औलाद जोपर्यंत राज्य करतेय तोपर्यंत देशाला चांगले दिवस येणार नाहीत, असे व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणतायत. हा व्हिडिओ दाखवल्यावर नितेश राणे यांनी आता कॉग्रेससमोर कोण झुकतंय, उद्धव ठाकरे, संजय राऊत? बाळासाहेबांच्या भाषेमध्ये उद्धव ठाकरेंना सेनाप्रमुख म्हणायचं की हि**** सेनाप्रमुख म्हणायचं, याचे उत्तर संजय राऊत यांनी आम्हाला द्यावे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

हे ही वाचा : ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो तो,’नारायण राणेंचे थेट आव्हान

बाळासाहेबांचा किती अपमान करणार आहात, हे उद्धव ठाकरे आणि कुटूंबियांनी ठरवावं, कारण ज्या कॉग्रेसबाबत बाळासाहेबांनी असे शब्द वापरले आहेत, त्या कॉंग्रेससोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला आहात, त्यांच्या सभेत बाळासाहेबांचे मोठे फोटो लावतायत, अशी टीका देखील नितेश राणे यांनी ठाकरेंवर केली.

ADVERTISEMENT

संजय राऊतांची बौद्धिक पात्रता नाही

संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमावर टीका केली होती. कोरोनात थाळ्या वाजवायचा आणि कालचा टाळ्या वाजवायचा कार्यक्रम होता, अशी खिल्ली देखील राऊत यांनी उडवली होती. या टीकेवर आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना आमच्या पंतप्रधानांचे भाषणच कळले नाही, तेवढी राजकीय उंचीच नाही, बौद्धिक पात्रता नाही, तेच अशी उत्तर देऊ शकतात, अशा शब्दात नितेश राणे यांना राऊतांवर टीका केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT