Maratha Reservation : भुजबळांचा सरकारला घरचा आहेर, ‘ओबीसींच्या लेकरांच्या तोंडचा घास…’

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chhgan bhujbal criticize mahayuti government maratha reservation manoj jarange patil maharashtra politics
chhgan bhujbal criticize mahayuti government maratha reservation manoj jarange patil maharashtra politics
social share
google news

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना काढली. या अधिसूचनेनंतर मराठ्यांनी राज्यभर जल्लोष केला असताना तिकडे ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्यात आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठल पार पडली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय, अशी टीका भुजबळांनी सरकारवर केली आहे. (chhgan bhujbal criticize mahayuti government maratha reservation manoj jarange patil maharashtra politics)

ADVERTISEMENT

बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच भुजबळांनी सरकारवर हल्ला चढवला. मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला आमच्या कोणाचाही विरोध नव्हता पण आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांचा जो घास काढून घेतला जातोय त्याबद्दल आम्हाला सर्वांना दु:ख आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Nitesh Rane : “पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय”

कारण 27 टक्के आरक्षण आम्हाला जाहीर झालं ते आम्हाला पूर्ण मिळालं नाही. साडे नऊ टक्के आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. EWS मध्ये 85 टक्के जागा मराठा समाजाला आहेत. ओपनमधूनही आहे. मराठा समाजातील ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना आरक्षण आहे. ओबीसी प्रमाणपत्र शिक्षणासाठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली आहेत. आधी फक्त मराठवाड्यात आरक्षण मागितलं. यानंतर ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट करण्यात आला, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

हे वाचलं का?

मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना रद्द करण्यात यावी. कुणबी प्रमाणपत्र आधीच सर्वांनी घेतले आहेत. एकीकडे सरकार म्हणते ओबीसीला धक्का लावणार नाही दुसरीकडे मात्र 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील प्रमाणपत्र मिळणार आहे. ओबीसी धक्का लावणार नाही आणि दुसरीकडे ओबीसी वाटेकरी मोठ्या प्रमाणात मराठा समाज घुसवण्याचा प्रयत्न करत आहे,असा आऱोपही छगन भुजबळ यांनी केला.

हे ही वाचा : फडणवीसांनी ओबीसी नेत्यांना सुनावलं, ‘मराठा आरक्षणात आम्ही सुवर्णमध्य…’

ओबीसी समाजाला फसविण्याचा काम सुरू आहे.. सगे सोयरे याची स्पष्ट व्याख्या असताना त्यात बेकायदेशीर बदल का केले जात आहे. या देशात शपथपत्र देऊन जात बदलता येत नाही. ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घेऊन ओबीसींना आरक्षणाच्या बाहेरच ढकलण्याचे काम सुरू असल्याची खंत  छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच येत्या 1 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलने केली जाणार आहेत त्याचबरोबर मराठवाड्यातून सुरवात करत संपूर्ण राज्यात ओबीसींची एल्गार यात्रा काढली जाणार आहे अशी माहिती देखील भुजबळांनी दिली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT