Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार? सरकारच्या निर्णयावर काय बोलले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

eknath shinde cabinet meeting decision marathas obc reservation will manoj jarange patil stop agitation
eknath shinde cabinet meeting decision marathas obc reservation will manoj jarange patil stop agitation
social share
google news

Manoj Jarange Patil Agitation : महायुती सरकारने नुकताच आरक्षणावर तोडगा काढला आहे. ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. यासोबत या दाखल्यासाठी पाच निवृत्त न्यायाधीशांची समितीही गठीत केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर गेल्या नऊ दिवसांपासून जालन्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) उपोषण मागे घेणार का? आणखीण कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (eknath shinde cabinet meeting decision marathas obc reservation will manoj jarange patil stop agitation)

ADVERTISEMENT

महायुती सरकारने आरक्षणावर तोडगा काढल्यानंतर एकीकडे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) सरकारचा निर्णय पत्रकार परिषदेत सांगत असताना, दुसरीकडे सरकारमधील मंत्री अर्जुन खोतकर जालन्यात आंदोलन स्थळी पोहोचले होते. यावेळी अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. इतकेच नाही तर जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्य़ासोबत फोनवर बोलणी करून दिली होती. या बोलणीनंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

हे ही वाचा : Rohit Pawar : ‘अजूनही वेळ गेलेली नाही…’ रोहित पवारांचा नेमका इशारा कुणाला

जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारने घेतलेल्या निर्णयाची पुन्हा स्वत:हून आंदोलकांना माहिती दिली.महाराष्ट्रातीला मराठा समाजातील वंशवळ ज्यांच्याकडे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकारने काढला असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. वडिलोपार्जित कुणबी कागदपत्रे असलेल्यांना उद्यापासून ओबीसी लाभासाठी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल असा जीआर काढण्यात आला आहे, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.

हे वाचलं का?

आधी जे निजाम राज्यात होते आणि आता मराठवाड्याचा भाग आहेत, त्यांनाही महाराष्ट्रात कुणबी दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे…त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती देखील जरांगे पाटील यांनी घेतली.

हे ही वाचा : Rupal ogre :संबंधास नकार दिल्याने…, एअर होस्टेस हत्याकांडात मोठा खुलासा

दरम्यान उद्या गुरूवारी 123 गावकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलावून एसीटॉनच्या मार्गावर चर्चा करू. तिथपर्यंत माझे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. आमरण उपोषण मागे घेण्याचा उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करेन, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी जाहिर केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT