Raj Thackeray: 'माझ्या हाती सत्ता द्या, 48 तासात महाराष्ट्र..', राज ठाकरेंनी काय केला दावा?
Raj Thackeray MNS: एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे हे मी दाखवून देईन. मी पोलिसांना 48 तास देईन, राज्य साफ करून टाकतील. असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्य कसे चालवायचे हे मी दाखवून देईन, राज ठाकरेंचं आवाहन
'मी पोलिसांना 48 तास देईन, राज्य साफ करून टाकतील ते'
राज ठाकरेंना मनसेच्या हाती हवी राज्याची सत्ता
यवतमाळ: राज्यात कायद्याचा धाक उरला नाही. संपूर्ण यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. एकदा राज ठाकरेंच्या हाती सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे हे मी दाखवून देईन. मी पोलिसांना 48 तास देईन, राज्य साफ करून टाकतील, असा विश्वास राज ठाकरेंनी यवतमाळच्या वणी येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. (give power to me police will clean maharashtra in 48 hours mns chief raj thackeray claim)
ADVERTISEMENT
राज्याचे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. चिखल झाला आहे. निवडणुकीत ज्या लोकांना मतदान करायचे, नंतर ते लोक विकले जातात. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे, तेच समजत नाही. तुम्हाला याचा राग येतो की नाही? विधानसभा निवडणूक हा तो राग व्यक्त करण्याचा मार्ग आहे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
हे ही वाचा>> Maharashtra Bandh: उद्धव ठाकरे उद्या स्वत: चौकात जाऊन बसणार, ठाकरेंची एक घोषणा अन्...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आज वर्धा येथे सायंकाळच्या 5 वाजता सुमारास वर्धेत दाखल झाले मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
हे वाचलं का?
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला. विद्यादीप सभागृहा येथे त्यांनी कार्यकर्त्यासोबत संवाद साधला. या संवाद दरम्यान कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याचे आदेशही दिले.
बदलापूर घटनेवर राज ठाकरेंचा संताप
बदलापूरमधील चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'बदलापूरच्या शाळेत लहान-लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?' असा सतंप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> "नराधमांना फाशीपर्यंत...", बदलापूरच्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की, या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या.' असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT