Jalna Maratha Morcha: ‘तो फोन आला अन्..’, लाठीहल्ल्याबाबत शरद पवारांचा मोठा आरोप
Jalna Maratha Morcha: जालन्यातील मराठा मोर्चा आंदोलकांवर जो लाठीहल्ला करण्यात आला तो वरिष्ठ लोकांच्या एका फोननंतर करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत असल्याचं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
Jalna Maratha Morcha Sharad Pawar: जालना: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (2 सप्टेंबर) तात्काळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कारभाराबाबत देखील टीका केली. (jalna maratha morcha after receiving a call from seniors police resorted to baton attack sharad pawar indirectly targeting devendra fadnavis)
ADVERTISEMENT
‘आंदोलक शांततामय पद्धतीने उपोषण करत होते. पण वरुन कोणाचा तरी फोन आला अन् वातावरण बिघडलं..’ असं म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
‘कोणाचा तरी फोन आला आणि नंतर पोलिसांनी…’
‘मी जखमी लोकांना भेटलो आणि आंदोलकांना भेटलो.. ते सतत एक गोष्ट सांगत होते की, आमचं सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण वरून आदेश आला. फोन आला कोणाचा तरी आणि पोलिसांचा दृष्टीकोन बदलला.. आता हा कोणाचा फोन आला ते आंदोलकांना माहीत नव्हतं. पण बाहेर जे लोक घोषणा देत होते ते राज्याच्या गृहमंत्र्यांसंबंधी घोषणा देत होते. पण त्यासंबंधीची खात्रीलायक माहिती माझ्याकडे नाही.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Shiv Sena UBT: ‘जे भा%$# आहेत त्यांना तुम्ही घेतलंय…’, उद्धव ठाकरेंची जीभ घसरली
‘आंदोलकांकडे मोबाइलमध्ये जे चित्रिकरण आहे ते पाहा, त्यात स्वच्छ असं दिसतंय की, लोक बसले आहेत कोण तरी अधिकारी चर्चा करतंय. पाठीमागून ज्यांच्या डोक्यावर हेल्मेट आहे असे पोलीस मोठ्या संख्येने येतात आणि ते येतात आणि थांबतात आणि थोड्या वेळाने ते सरळ उठून लाठीहल्ला करायला सुरुवात करतात. ते लाठीहल्ला करताना सैरावैरा धावतात. हा त्यांच्यावरचा हल्ला पोलिसांवर हल्ला झालेला दिसत नाही. पोलिसांकडून हल्ला झाला असं दिसतं.’
‘मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांची नोकरी आहे.. त्यांना कोणी आदेश दिला असेल त्यासंबंधीची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी व्हायची असेल तर उच्चस्तरीय होऊन चालणार नाही. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी करत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
‘मुख्यमंत्री समंजस पण दुसरं कोणी…’
‘आम्ही राजकारणी आहोत. आमच्यात शक्तीशाली कोण असतो.. तर ज्याच्याकडे बहुमत असतं ते शक्तीशाली असतात. त्यामुळे आजच्या सरकारमध्ये अधिक संख्यावाले कोण आहेत? त्यांना शक्तीशाली मान्य करावं लागेल.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Jalna Maratha Andolan Update: ‘लाठीहल्ला करुन…’ संभाजीराजे संतापले, डागली तोफ
‘एवढं आहे की, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समंजसपणाची आहे. मुख्यमंत्र्याचा अॅप्रोच समंजस असताना सरकारच्या वतीने दुसरा दृष्टीकोन घेऊ शकतं असं कोण आहे त्या ठिकाणी? शोधावं लागेल.’ असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात संवाद नसल्याचा एक प्रकारे दावा केला आहे.
‘काही झालं तरी कायदा हातात घेऊ नका. शक्य असेल तर उपोषण सोडा.. कुठे जाळपोळ, हिंसा होत असेल तर ती होऊ देऊ नका.. हे सगळं सांगणं म्हणजे संधीसाधूपणा आहे का? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT