“शरद पवार उद्याच…”, जयंत पाटलांनी सांगितली राष्ट्रवादीची पुढची रणनीती

मुंबई तक

ADVERTISEMENT

jayant patil reaction on ajit pawar dcm and ncp 9 mla oath ceremony maharashtra politics
jayant patil reaction on ajit pawar dcm and ncp 9 mla oath ceremony maharashtra politics
social share
google news

Maharashtra Political Latest News : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 9 नेत्यांनी आज मंत्री पदाची शपथ घेऊन महाराष्ट्रात मोठा राजकीय भुकंप घडवून आणला. या घटनेनंतर आता शरद पवार यांची पुढची रणनीती काय असणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देऊन पक्षाची पुढची रणनिती स्पष्टपणे सांगितली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा ना भाजप-शिंदेंना पाठिंबा आहे, ना सरकारमध्ये समाविष्ट झालेल्या नेत्यांना पाठींबा आहे, अशी स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.(jayant patil reaction on ajit pawar dcm and ncp 9 mla oath ceremony maharashtra politics)

ADVERTISEMENT

जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.जेव्हा जेव्हा अशी संकट येतात, तेव्हा तेव्हा शरद पवार प्रचंड मोठ्या ताकदीने बाहेर पडतात, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यासोबत उद्याच शरद पवार सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जातायत. ज्यांनी महाराष्ट्र स्थापनेचा अमृत कलश आणला, त्यांच्या समाधीचे पवार साहेब दर्शन घेणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

या महाराष्ट्राचे राजकारण हे बेरजेचे असले पाहिजे. महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार टीकला पाहिजे. महाराष्ट्रात सर्वसामान्य, गोरगरीब, पद दलितांना न्याय देण्याचे काम झाले पाहिजे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे, महाराष्ट्राचा चौफेर विकास केला पाहिजे. ही भूमिका जी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला सांगितली, त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पवार साहेब जात आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

तसेच महाराष्ट्रात शाहु, फुले, आंबेडकरांचं राजकारण अधिक ताकदीने, पुरोगामी चळवळीचे राजकारण अधिक ताकदीने महाराष्ट्रात टीकवण्याचे काम शरद पवार करतायत. ते उद्या तिथे जातायत याला विशेष महत्व असल्याचे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते भाजपसोबत जाण्यास आग्रही होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच असायची. यावर जयंत पाटील म्हणाले की, पक्षात यापुर्वी 7-8 जण अशी भूमिका मांडायचे, पण त्याला कधीही मान्यता सर्वोच्च नेत्यांनी आणि पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी दिली नाही,असे त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

तसेच तुम्हाला निमंत्रण होते का असा देखील सवाल पत्रकारांनी विचारला होता. यावर जयंत पाटील म्हणाले, मला निरोप, तो विषय वेगळा आहे. तो मी डिल करेन, त्यावेळी मी स्वतंत्र बसून माहिती देईन.तसेच कोणाला सध्या बोलावले जातेय, ईडी त्यांच्यावर काय दबाव आणतेय, त्यांना काय बोललं जातेय यावर मी नंतर भाष्य करेन, असे देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT