‘साहेबांशिवाय पर्याय नाही…’,ठाण्यात कोणी झळकावले पोस्टर्स?

मुंबई तक

ADVERTISEMENT

jitendra awhad flashes banner in thane there is no option of Saheb
jitendra awhad flashes banner in thane there is no option of Saheb
social share
google news

Jitendra awhad flashes banner in thane : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यासाठी नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी खुप प्रयत्न केले आहेत. काहींनी राजीनामे दिले, तर काहींनी रक्तांनी लिहलेली पत्र पाठवली, तर कुणी चिंचेच्या झाडावर चढलं होते. आता त्यात भर म्हणून बॅनरबाजीही करण्यात आली आहे. ठाण्यात आता ‘साहेबांशिवाय पर्याय नाही…’अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. हे बॅनर सध्या शहरवासियांचे लक्ष वेधून घेत आहे. (jitendra awhad flashes banner in thane there is no option of Saheb demand withdrawal of resignation)

ADVERTISEMENT

ठाण्यात ‘साहेबांशिवाय पर्याय नाही…’अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनर वर शरद पवार (Sharad pawar) यांचा फोटो असून त्याखाली साहेबांशिवाय पर्याय नाही असा मजकूर लिहिण्यात आलाय. हे बॅनर जुन्या मुंबई पुणे बेलापूर मार्गावरील कळवा नाक्यावर तर ठाण्यातील बऱ्याच ठिकाणी लावण्यात आले आहेत.आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे शहराध्यक्ष आनंदप परांजपे यांनी ही बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीद्वारे शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. गुरवारी रात्री हे बॅनर लावण्यात आले होते, त्यानंतर पहाट होताच आता हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे ही वाचा : कात्रजचा घाट, तेल लावलेला पैलवान.. ‘पॉवर’फुल पवारांचे प्रचंड इंटरेस्टिंग किस्से!

सेनापतीला सैन्याच्या आग्रहाखातर मैदानात रहावं लागेल…

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून देखील शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. साहेब राजीनाम्यावर ठाम आहेत तर आम्ही त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यावर ठाम आहोत असे जितेंद्र आव्हाड म्हणतात. साहेबांच्या भाषणातील एक वाक्य मला आठवलं की, सामुदायिक शक्तीचा नेहमी विजय होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय कार्यकर्ता साहेबांच्या राजीनाम्यामुळे व्यथित आहे आहे. युद्ध समोर आहे आणि सेनापती नाही. ‘युद्ध जिंकता येत नाही’. त्यामुळे सेनापतीला सैन्याच्या आग्रहाखातर मैदानात रहावं लागेल, असे ट्वीट करून आव्हाडांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

शरद पवार कार्यकर्त्यांना काय म्हणाले?

पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्या तुमच्या रुपाने व्यक्त होत आहेत. कालही व्यक्त झाली.. आजही तुम्हाला बघितल्यावर लक्षात आलं की, तुम्ही काही फक्त मुंबईतून आलात असं नाही. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आला आहात. मी जो काही निर्णय घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. पुढे पक्षाचं काम कसं चालावं.ही गोष्ट खरी आहे की, असे निर्णय घेताना सहकाऱ्यांसोबत विचार-विनिमय करण्याची आवश्यकता असते. मी त्याचा विचार केला. पण मला एक खात्री होती की, तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणाला नसता.दोन दिवसांनी तुम्हाला असे आंदोलन करावे लागणार नाही, असे सुचक विधान देखील शरद पवार यांनी वाय.बी.सेंटरबाहेर आंदोलक कार्यकर्त्यांशी बोलताना केले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार, राजीनाम्याच्या निर्णयावर यू-टर्न?

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT