NCP Leader: शरद पवारांची मोठी घोषणा, अखेर राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे

मुंबई तक

ADVERTISEMENT

live ncp chief sharad pawar will make a big announcement on his decision to resign press conference
live ncp chief sharad pawar will make a big announcement on his decision to resign press conference
social share
google news

Sharad Pawar lastest news: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अखेर आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे. स्वत: शरद पवार यांनी वाय. बी. सेंटर येथे पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षपदी कायम राहण्याची घोषणा केली आहे. यावेळी  (live ncp chief sharad pawar will make a big announcement on his decision to resign press conference)

ADVERTISEMENT

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत नेमकी काय घोषणा केली?

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर आज (5 मे) पडदा पडला आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे अखेर शरद पवार यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. यामुळेच शरद पवार हे यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

शरद पवारांचं पत्रकार परिषदेतील भाषण जसंच्या तसं

दिनांक २ मे, २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

हे वाचलं का?

परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मी पुनश्च: अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद!

असं म्हणत शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढचं राजकारण कसं असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT