Maharashtra Breaking News : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका! 22 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra breaking news in marathi : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर काल गौराईंचेही आगमन झाले.
ADVERTISEMENT
गणेशोत्सव काळात पुण्यात गर्दी वाढली. वाढती गर्दी पाहता संध्याकाळी ५ नंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. संध्याकाळी ५ नंतर लक्ष्मी रोड , शिवाजी रोड ,बाजीराव रोड, टिळक रोड बंद ठेवला जाणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा पोलिसांना आवाहन केलं आहे. आजपासून पुण्यात गर्दी वाढणार आहे. पोलिसांनी पर्यायी मार्गांची यादी जाहीर केली आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
- 01:24 PM • 11 Sep 2024
Maharashtra News : देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेचा धिंडवडे काढलेत – संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेचा धिंडवडे काढलेत. गाडी ज्याच्या नावावर, त्याचं नावच FIR मध्ये नाही. बीफ कटलेटही ऑर्डर केलं होतं. बीलमध्ये उल्लेख आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.
- 01:23 PM • 11 Sep 2024
Maharashtra News : अमोल कोल्हे यांची अजित पवार गटावर टीका
अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “सध्या जे सर्व्हे येतायत, ते ७ ते १२ जागा अजित पवार गटाच्या येतील. मग बाकीचे ३० आमदार काय करणार? हरी हरी! तेव्हा त्यांना वाटेल तेव्हाच तुतारी बरी होती. राज्यात महाविकास आघाडीच सरकार येणार. महाराष्ट्र चुकीला माफ करतो पण गद्दारांना नाही,” असं ते म्हणाले.
- 10:15 AM • 11 Sep 2024
मोठी बातमी! कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
कोयना धरण परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला आहे. रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात बसला आहे. या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 किलोमीटर हेळवाक गावाच्या 6 कि.मी अंतरावर होता. हा धक्का जाणवला नसल्याचे संबंधित विभागाने म्हटले आहे. दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून आज रात्री झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून 8.8 कि मि अंतरावर हेळवाक गावच्या हद्दीत 7 किलोमीटर खोलीवर होता. अशी माहिती भूकंप मापन केंद्रातून देण्यात आली.
- 09:36 AM • 11 Sep 2024
Maharashtra News : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका! 22 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
गेल्या काही दिवसांपासून मराठवा़ड्यात अतिमुसळधार पाऊस बरसरत आहे. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत मराठवाड्यातील 22 लाख 48 हजार 445 शेतकऱ्यांचं 18 लाख हेक्टर पेक्षाही अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळबागांचा प्रचंड नुकसान झालं आहे.
ADVERTISEMENT