लाइव्ह

One Nation One Election : एक राष्ट्र, एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

One Nation One Election Bill Cleared In Cabin
One Nation One Election Bill Cleared In Cabinet
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आलीय. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलीय. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण मागे न घेण्यावर जरांगे ठाम आहेत. दरम्यान आज जरांगे यांची आरोग्य पथकाकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्यास सांगितले आहे. मात्र उपचार घेण्यास जरांगे यांचा नकार पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

तसेच, 'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालत गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. अनेक तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. यावेळी चौपाटीचा परिसर गणेश भक्तांनी फुलून गेलेला होता.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

ADVERTISEMENT

  • 02:46 PM • 18 Sep 2024

    One Nation One Election: वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

    राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे. वन नेशन वन इलेक्शन सुरु करण्याबाबत मोदी सरकारने घोषणा केली होती. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून महायुती सरकारला चुकीच्या पद्धतीनं राजकारण करायचं आहे, असं विरोधकांचं म्हणणं होतं. परंतु, आता वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली असून आगामी निवडणुकांमध्ये राजकीय वातावरणात काय बदल होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • 12:44 PM • 18 Sep 2024

    Pune News: 24 तासानंतरही पुण्यात विसर्जन मिरवणुका सुरुच

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला 24 तास झाले आहेत. अजून ही मिरवणुका चालूच आहेत. आता पर्यंत 116 गणेश मंडळाचे विसर्जन झाले आहे. काल 10 वाजून 20 मिनिटांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस हार घालून, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड या मार्गावरून अजूनही मिरवणूक सुरूच आहे. आता या मिरवणुकीला 24 तास उलटले आहेत.

     

  • 12:42 PM • 18 Sep 2024

    Maharashtra News: बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू

    बार्शीत मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांकडून अनोखे उपोषण सुरू… खाली डोकं वर पाय करत सुरू केले अनोखे उपोषण… आनंद काशीद या जरांगे समर्थकाने सुरू केले हे अनोखे आंदोलन… अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बार्शीत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आले उपोषण… बार्शीतील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण द्यावे या मागणीसाठी सुरू केलं उपोषण…

     

     

follow whatsapp

ADVERTISEMENT